वाचाः
iOS युजर्संना थोडी वाट पाहावी लागणार
WhatsApp ने व्हिडिओ स्टेट्सची मर्यादा अँड्रॉयड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी कमी केली होती. आता कंपनी केवळ अँड्रॉयडसाठी ही व्हिडिओ मर्यादा वाढवत आहे. म्हणजेच iOS युजर्संना यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
व्हॉट्सअॅपवर येतोय मेसेंजर रुम्स व्हिडिओ चॅट फीचर
फेसबुककडून गेल्या महिन्यात घोषणा करण्यात आली होती की, नवीन मेसेंजर रुम्स लवकरच युजर्संना व्हॉट्सअॅपवर मिळेल. त्यानंतर कंपनीने अँड्रॉयड अॅप बीटा व्हर्जनवर फीचरची चाचणी सुरू केली होती. आता ही माहिती समोर आली आहे की, स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅपमध्ये येण्याआधी मेसेंजर रुम फॉर व्हॉट्सअॅपच्या Whatsapp Web वर ते रोलआऊट करण्यात येईल. लवकरच या नवीन फीचरमुळे युजर्संसाठी व्हिडिओ कॉलिंगचा ऑप्शन दिसणार आहे.
वाचाः
रिपोर्टमध्ये म्हटले की, या फीचरला आता पर्यंत रोलआऊट करण्यात आले नाही. तसेच भविष्यात अपडेट्स मध्ये हे सर्व युजर्संना मिळू शकणार आहे. मेन अॅपच्या स्मार्टफोनवर हे एक वेगळे फीचर म्हणून व्हॉट्सअॅपमध्ये समावेश करण्यात येणार आहे. रिपोर्टमध्ये म्हटले की, युजर्संला डॉक्यूमेंट्स आणि गॅलरी पर्यायासोबत एक नवीन आयकॉन मेसेंजर रुम्स सुद्धा दिसेल. युजर्सला पुढील महिन्यात हे पर्याय मिळू शकतील.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times