नवी दिल्लीः एअरटेल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनी आपल्या युजर्संसाठी २५१ रुपयांचा नवीन डेटा व्हाऊचर घेऊन आली आहे. कंपनीने हे व्हाऊचर रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणले आहे. जिओप्रमाणे एअरटेलच्या या व्हाऊचरमध्ये ५० जीबी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे. कंपनीने हे व्हाऊचर खास त्या युजर्संसाठी आणले आहे. ज्या युजर्संना लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे.

वाचाः

एअरटेलचा २५१ रुपयांचे व्हाऊचर
एअरटेलचे हे व्हाऊचर ५० जीबी अनलिमिटेड डेटा ऑफर देत आहे. पॅकची वैधता जेव्हढी आहे. तेव्हढी युजर्संना या पॅकमधील मिळणारा डेटा एका दिवसांत संपवायचा आहे. हे एक डेडिकेटेड डेटा पॅक आहे. त्यामुळे या पॅकमध्ये कॉलिंग किंवा फ्री एसएमएसची सुविधा दिली जात नाही.

जिओचा २५१ रुपयांचा प्लान
जिओने काही दिवसांपूर्वी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युजर्संसाठी २५१ रुपयांचा डेटा व्हाऊचर बाजारात आणला होता. या डेटा व्हाऊचरमध्ये ५० जीबी अनलिमिटेड डेटा मिळत होता. जिओच्या या व्हाऊचरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा एक स्टँड अलोन पॅक आहे. ज्यात ३० दिवसांची वैधता मिळते. एअरटेलप्रमाणे या प्लानमध्ये सुद्धा कॉलिंग किंवा फ्री एसएमएस ऑफर केली जात नाही.

एअरटेलने ९८ रुपयांचा पॅक बदलला
एअरटेलने नुकताच आपल्या ९८ रुपयांच्या डेटा व्हाऊचरमध्ये बदल केला आहे. डेटाची वाढती मागणी आणि युजर्समध्ये या प्लानची वाढलेली प्रसिद्धी पाहता या पॅकमध्ये दिला जाणारा डेटा वाढून तो आता डबल करण्यात आला आहे. सुरुवातीला या पॅकमध्ये ६ जीबी डेटा दिला जात होता. परंतु, आता या पॅकमध्ये १२ जीबी डेटा दिला जात आहे. पॅकची वैधता सध्याच्या प्लान इतकीच आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here