नवी दिल्लीः युजर्सची चॅटिंग आणखी मजेदार करण्यासाठी कंपनी एकापेक्षा एक फीचर देते. २०० कोटी हून अधिक युजर्स असलेले WhatsApp हे जगातील नंबर वन मेसेजिंग अॅप आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हॉट्सअॅपमध्ये अनेक अपडेट आणि फीचर मिळाले आहेत. यातील एक म्हणजे डिलीट झालेले मेसेज एक आहे. या फीचरला कंपनीने २०१७ ला लाँच केले होते. युजरने चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतो. डिलीट झालेले मेसेज ग्रुप किंवा पर्सनल चॅटवरून गायब होतात. डिलीट झालेले मेसेज कोणी पाहू शकत नाही. परंतु, यात एक खास ट्रिक आहे. ज्यामुळे डिलीट झालेले मेसेज वाचता येऊ शकतात.

वाचाः

असे वाचा डिलिट झालेले मेसेज
चॅट मधून डिलीट झालेले मेसेज वाचण्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉयड स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. जर अँड्रॉयड स्मार्टफोन युजर आहात तर या स्टेप्सच्या माध्यमातून तुम्ही सहज डिलीट झालेले मेसेज वाचू शकता.

१. सर्वात आधी आपल्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोरमधून WhatsRemoved+ अॅप डाउनलोड करा.

२. डाऊनलोड केल्यानंतर अॅपला सर्व अॅक्सेस द्या. जे ते मागत आहेत.

३. परमिशन दिल्यानंतर अॅपमध्ये पुन्हा जा.

४. या ठिकाणी त्या अॅपसंबंधी विचारले जाईल. ज्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सेव्ह करायचे आहे किंवा अॅपमध्ये बदल करायचा आहे.

५. अॅप्सच्या यादीत व्हॉट्सअॅपची निवड करा.

६. पुढील स्क्रीनवर Allow टॅप करा आणि Yes, Save Files ला सिलेक्ट करा. असे केल्यानंतर अॅपची सेटिंग पूर्ण होईल. व हे वापरासाठी तयार होईल.

७. यानंतर व्हॉट्सअॅपवर सर्व नोटिफिकेशनसोबत डिलीट झालेले मेसेज या ठिकाणी सेव्ह केलेले मिळतील.

८. पाहण्यासाठी तुम्हाला केवळ या अॅपला ओपन करून टॉप बारमध्ये व्हॉट्सअॅप सिलेक्ट करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअॅप मध्ये डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी ही एक खास ट्रिक आहे. या अॅपमध्ये येत असलेल्या जाहिरातीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. परंतु, जर तुम्ही या सेवेसाठी १०० रुपये मोजल्यास तुम्हाला या जाहिरातीचा त्रास होणार नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here