चीनमधील करोनाचे संकट आता संपूर्ण जगाचे संकट बनले आहे. जगभरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने लोकांमध्ये करोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. करोनाला हरवण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करीत आहे. वैज्ञानिक दिवस रात्र मेहनत करीत आहेत. आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, सफाई कर्मचारी आपापल्या परीने सेवा बजावत आहेत. परंतु, या संकटातही काही लोक आपले काळे धंदे सोडायला तयार नाही. काही लोकांचे करोनामुळे चांगलेच फावले आहे. करोनाच्या दहशतीचा फायदा घेताना काही जण दिसत आहे. स्मार्टफोन युजर्ससाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. स्मार्टफोन युजर्सवर पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. स्मार्टफोन युजरच्या धोक्याला देशातील सीबीआयने गंभीरपणे घेतले आहे. त्यामुळे देशभरात सीबीआयने अलर्ट जारी केला आहे. सीबीआयने या अलर्टमध्ये राज्यातील पोलीस, आणि कायद्याचे संरक्षण करणाऱ्या संस्थांना एका मेलवेअर (व्हायरस) वर खास नजर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. हे खतरनाक व्हायरस करोना व्हायरस अपडेट्शी जोडलेले आहे.

मंगळवारी सीबीआयने या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे. इंटरपोलकडून काही इनपूट्स मिळाले आहेत. या माहितीवरून बँकिंग ट्रोजन ‘Cerberus’ ने सांगितल्याने हे अलर्ट जारी करावे लागत असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या व्हायरसची काम करण्याची पद्धत सांगताना सीबीआयने म्हटले की, ‘Cerberus’ करोना व्हायरस महामारीचा गैरफायदा घेत युजर्संना खोटे मेसेज पाठवत आहे. करोना संदर्भात माहिती आहे, असे समजून अनेक जण याला बळी पडू शकतात. त्यासाठी सीबीआयने आधीच सर्वांना अलर्ट केले आहे.

करोनाच्या भीतीपोटी अनेक जण करोनाची माहिती जाणून घेण्यासाठी अनेक लिंक्सवर क्लिक करत असतात. ऑनलाइन आर्टिकल आणि रिसर्च पेपर्सची माहिती खूप वाचली जात आहे. करोना व्हायरसचे संकट गडद झाल्याने त्याचे उपाय त्याची माहिती वाचण्यासाठी लोक फार उत्सूक असतात. ही भीती हेरून हॅकर्सने टेक्स्ट मेसेज तयार केला आहे. या टेक्स्ट मेसेजची लिंक हॅकर्स पाठवत आहेत. या लिंकला करोना व्हायरस संदर्भातील माहिती सांगितले जाते. हॅकर्सच्या या खेळाने अज्ञान युजर्स लिंकला क्लिक करतात. क्लिक करताच हा धोकादायक व्हायरस फोनमध्ये इन्स्टॉल होतो.

तज्ज्ञ आणि ब्लॉगर्सच्या माहितीनुसार, ‘Cerberus’ हा खतरनाक व्हायरस आहे. युजर्संनी यापासून सावध राहायला हवे, असा सल्ला एक्स्पर्ट्स आणि ब्लॉगर्संनी दिला आहे. एकदा हा फोनमध्ये इन्स्टॉल झाला तर तो खूप जास्त डेटा चोरी करू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे युजर्सचा पर्सनल डेटासोबत दुसरी महत्त्वाची माहिती चोरीला जाऊ शकते. त्या माहितीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. एक्स्पर्ट्सच्या माहितीनुसार, हॅकर्स या डेटाला चोरी करून ती सर्व माहिती रिमोट सर्व्हरवर पाठवून देते.

सीबीआयच्या माहितीनुसार, ‘Cerberus’युजर्सच्या बँकिंगची माहिती चोरी करू शकतो. बँकेच्या माहितीला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो सीबीआयने अलर्ट राहण्याचा सल्ला देताना म्हटले की, हे ट्रोजन युजरची फायनान्शियल डेटा म्हणजे, क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर आणि अन्य माहिती चोरी करण्यासाठी बनवण्यात आला आहे. तसेच मोठ्या सहजतेने युजर्संना आपल्या जाळ्यात अडकवू शकतो. त्यानंतर युजर्संची खासगी माहिती, बँक संदर्भातील माहिती आणि टू फॅक्टर ऑथेंटिक डिटेल्सला अॅक्सेस करून घेतो. त्यामुळे युजर्संनी अलर्ट राहणे गरजेचे आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here