स्मार्टफोनमध्ये लागोपाठ नवीन-नवीन अपडेट येत आहेत. बॅटरी बॅकअप, कॅमेरा युजर्संना चांगला हवा असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात खूप बदल झालेला पाहायला मिळत आहे. युजर्संना सुद्धा आता जास्त मेगापिक्सल असलेले स्मार्टफोन पसंत पडत आहेत. ज्या स्मार्टफोनमध्ये चांगला स्पेसिफिकेशनचा कॅमेरा सेटअप दिला आहे. अशाच स्मार्टफोनची मागणी वाढताना दिसत आहे. ज्या युजर्संना मोबाइल फोटोग्राफीची आवड आहे. ते युजर्स अशाच स्मार्टफोनच्या शोधात असतात. बेस्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी या युजर्संची पसंती आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या काही खास स्मार्टफोनची माहिती देत आहोत. या स्मार्टफोनच्या मदतीने तुमची फोटोग्राफीची आवड पूर्ण होईल. तसेच तुम्हाला चांगले फोटो काढल्याचा अनुभव मिळेल. जाणून घ्या १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचा या स्मार्टफोनविषयी…..

सॅमसंगच्या गॅलेक्सी एस २० अल्ट्रा या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. १२ जीबी रॅम आणि 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा शिवाय ४८ मेगापिक्सलचा आणि एक १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ४० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस२० सीरिजमधील हा फोन सर्वात प्रीमियम फोन आहे. यात 100x डिजिटल झूमसह १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हा महागडा स्मार्टफोन आहे. याची किंमत ९२ हजार ९९९ रुपये आहे.

मोटोरोलाच्या या प्रीमियम फोनमध्ये 108MP+16MP+8MP चे ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये २५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनच्या मुख्य कॅमेऱ्याला ६ K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये १०८ कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, १ टाईम ऑफ फ्लाइट सेन्सर आहे. सेल्फी युजर्संसाठी खास २५ MP फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची किंमत ७० ते ८० हजार रुपये या दरम्यान आहे.

चीनची कंपनी शाओमीच्या Mi नोट 10 प्रो या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला असून त्यासोबत आणखी एक ५ मेगापिक्सलचा, एक १२ मेगापिक्सलचा आणि एक २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी खास ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ८ जीबी रॅमच्या या फोनमध्ये ५२६० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. भारतात Mi Note 10 Pro या स्मार्टफोनची किंमत जवळपास ५० हजार ते ५५ हजार रुपये असू शकते.

शाओमीच्या या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनमध्ये ४७८० mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ५जी कनेक्टिविटीचा सपोर्ट करण्यासाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारीत MIUI 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. शाओमीने या स्मार्टफोमध्ये चार क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत ४६९९ चिनी युआन म्हणजेच भारतात या फोनची किंमत जवळपास ४८ हजार रुपये आहे.

क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप असलेल्या या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा, एक १२ मेगापिक्सलचा आणि एक २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी काढण्यासाठी या फोनमध्ये खास २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत ५० हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत आहे. या फोनमध्ये ८के रिझॉल्यूशनचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा आहे. तसेच या फोनमध्ये ४७८० mah क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचे फीचर दिले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here