Amazon Great Freedom Festival sale: ऑगस्ट महिन्यात अनेक महत्त्वाचे सण असतात. रक्षाबंधन, गणेश चतुर्थीसह स्वातंत्र्य दिन सारखे अनेक महत्त्वाचे सण आणि दिवस या महिन्यात असतात. सणांच्या निमित्ताने ई-कॉमर्स साइट वेगवेगळ्या सेलचे आयोजन करतात. जेणेकरून, ग्राहकांना अगदी कमी किंमतीत नवनवीन वस्तू खरेदी करताना मदत होईल. तुम्ही देखील लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्टवॉच अथवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. उद्यापासून Amazon वर Great Freedom Festival sale ची सुरूवात होत आहे. ६ ऑगस्टपासून सुरू होणारा हा सेल १० ऑगस्टपर्यंत चालेल. तुम्ही रक्षाबंधन निमित्ताने बहिणीसाठी खास गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. Amazon Great Freedom Festival sale मध्ये तुम्हाला वस्तूंवर ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. सेलमध्ये मिळणाऱ्या या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​स्मार्टफोनवर मिळेल खास ऑफरचा फायदा

Amazon sale मध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरात उपयोगी येणाऱ्या वस्तू, कपडे आणि ब्यूटी प्रोडक्ट्सला स्वस्तात खरेदी करू शकता. सेल फोन खरेदी करण्यासाठी हा सेल खूपच फायद्याचा ठरेल. सेलमध्ये फोनवर ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय, नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सारखी ऑफर देखील उपलब्ध आहे. याशिवाय, एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर केल्यास दोन हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळेल.

​प्रीमियम स्मार्टफोन मिळतील स्वस्तात

Amazon Great Freedom Festival sale मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीने सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या स्मार्टफोन्सला लिस्ट केले आहे. सेलमध्ये iPhone 13, iQoo 9 5G सारख्या प्रीमियम स्मार्टफोन्सला लिस्ट करण्यात आले आहे. याशिवाय, गॅलेक्सी ए७३ ५जी फोन देखील स्वस्तात उपलब्ध आहे. ग्राहक अगदी २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये Redmi Note 11, iQoo Z6 सारखे दमदार फीचर्ससह येणारे फोन्स खरेदी करू शकतात.

वाचा: iPhone 14 च्या लाँचआधी iPhone 13 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, किंमत पाहून विश्वास बसणार नाही

​रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट द्या हे स्मार्टफोन्स

या सेलमध्ये आयफोन १३ बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोनची रिटेल किंमत ७०,९०० रुपये आहे. iQOO 9 आणि iQOO 9 Pro सारखे फोन्स देखील डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या फोन्सची किंमत क्रमश: ४२,९९० रुपये आणि ६४,९९० रुपये आहे. तसेच, सॅमसंग गॅलेक्सी ए७३ स्मार्टफोनला तुम्ही ४८,९९० रुपयांऐवजी ४१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तुम्ही जर फ्रेंडशिप डे ला मित्र-मैत्रिणीला अथवा रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट देण्यासाठी स्मार्टफोन शोधत असाल तर हे चांगले पर्याय आहेत.

वाचा: Google कडे तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे कशी काय असतात? जाणून घ्या

​२० ते ३० हजारांच्या बजेटमध्ये मिळेल चांगले फोन

सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए३३ ५जी फोन ३२,९९० रुपयांऐवजी फक्त २५,४९९ रुपयात उपलब्ध होईल. OPPO F21 Pro ला २१,७४९ रुपये आणि iQOO Neo 6 5G ला फक्त २५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सेलमध्ये २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये देखील चांगले फोन्स मिळतील. अॅमेझॉन सेलमध्ये Realme Narzo 50 ला १२,९९९ रुपये, Xiaomi 11 Lite NE 5G ला १८,४९९ रुपये आणि iQOO Z6 5G ला १२,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सेलमध्ये इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर देखील आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल.

​Flipkart Big Saving Days sale देखील उद्यापासून होणार सुरू

flipkart-big-saving-days-sale-

अॅमेझॉनसोबतच Flipkart Big Saving Days sale देखील उद्यापासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. या सेलमध्ये तुम्ही सॅमसंग, रियलमी, शाओमीसह इतर ब्रँड्सच्या टीव्हीला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. Apple, Vivo, Oppo, Motorola सारख्या ब्रँड्सचे फोन देखील तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टवॉचवर १० ते ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. हा सेल देखील १० ऑगस्टपर्यंत चालेल.

वाचा: एकापेक्षा एक भन्नाट फीचर्ससह Noise Smartwatch भारतात लाँच, किंमत खूपच कमी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here