वाचाः
९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स
इंडियाच्या वेबसाईटवर ९८ रुपयांचा प्लान नवीन डेटासोबत देण्यात आला आहे. कंपनी आता या पॅकमध्ये १२ जीबी हाय स्पीड डेटा देत आहे. आधी या प्लानमध्ये केवळ ६ जीबी डेटा दिला जात होता. कंपनीच्या वेबसाईटवर हा प्लान अॅड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानचा एक स्टँड अलोन प्लान म्हणून वापर केला जाऊ शकतो.
एअरटेलनेही ९८ रुपयांचा प्लान बदलला
एअरटेलने ९८ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारा डेटामध्ये गेल्या आठवड्यात बदल केला होता. डेटाची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीने या पॅकमध्ये ६ जीबी एक्स्ट्रा डेटा द्यायला सुरुवात केली होती. आता या पॅकमध्ये युजर्संना एकूण १२ जीबी डेटा मिळतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्संना एक्स्ट्रा डेटा साठी अॅक्टिव प्लानच्या वर टॉप अप करू शकतात. या प्लानची वैधता सध्याच्या प्लान इतकीच आहे.
वाचाः
या सर्कलमध्ये उपलब्ध झाला प्लान
व्होडाफोनने आपला ९८ रुपयांचा प्लान डबल बेनिफिटला काही सर्कलमध्ये ऑफर करीत आहे. सध्या १०० टक्के एक्स्ट्रा डाटाचा लाभ आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, मुंबई आणि यूपी ईस्टचे युजर्स घेऊ शकतात. कंपनी लवकरच देशभरातील अन्य सर्कलमध्ये हा प्लान उपलब्ध करेल, अशी शक्यता आहे. ऑफर कोणत्या सर्कलमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. याची सविस्तर माहिती कंपनीच्या वेबसाईटवर दिली गेली आहे.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times