दावा

ट्विटर युजर Alex Ambedkar ने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात एक व्यक्ती टेबलावर ठेवलेल्या जेवणाला लाथ मारत आहे. समोर उभी असलेली महिला त्याच्यावर ओरडत आहे. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ‘मेरिट धारी’ने दलित महिलेच्या हातचे जेवण खायला नकार दिला आहे.

‘मेरिट धारी’ चा वाप करुन उच्च वर्णीयांवर टीका करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

व्हिडिओला बातमी लिहिपर्यंत ६ हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे. आणि ४ लाख २५ हजार हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

ट्विटचे
ठिकाणी पाहा

हाच व्हिडिओ फेसबुकवर याच दाव्याने शेअर करण्यात येत आहे. शिराज अहमद आणि भुजोली कुर्द नावाच्या दोन लोकांनी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दलित महिलेच्या हातचे जेवण खाण्यास नकार दिला आहे, असे म्हटले आहे.

पोस्टचे आर्काइव्ड व्हर्जन
पाहू शकता.

खरं काय आहे ?

व्हिडिओ सोबत करण्यात आलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील आहे. ज्या ठिकाणी मधवापूर प्रखंडच्या एका महाविद्यालयाला क्वॉरंटाईन सेंटर बनवण्यात आले आहे. या ठिकाणी राहत असलेले जेवण बनवणारे व्यक्ती सोशल डिस्टेंसिंगच्या नियमामुळे चिंतित होते. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमा शिवाय त्यांना जेवण बनवू द्यावे अशी त्यांची मागणी होती. असे न झाल्याने त्यांनी गदारोळ केला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी केली पडताळणी ?

व्हिडिओमध्ये एका जागी शाळेचे नाव आणि ठिकाण दिसत आहे. ज्यावरून हा व्हिडिओ बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील मधवापूर येथील असल्याचे स्षप्ट झाले. त्यानंतर आम्ही काही कीवर्ड्स सर्च केले. तर आम्हाला
ची एक बातमी मिळाली. या बातमीचे शीर्षक ‘बिहार के मधुबनी में प्रवासियों ने भोजन में मारी लात, महिला रसोइयों से किया दुर्व्यवहार’असे होते. या बातमीतील फोटो चुकीच्या दाव्याने शेअर करण्यात येत असलेल्या व्हिडिओतील व्हिज्युअल्सप्रमाणे दिसत आहे.

या बातमीनुसार, महाविद्यालय साहरघाट क्वॉरंटाइन सेंटरवर २५ जण मजूर क्वॉरंटाईन करण्यात आले आहेत. सोमवारी दुपारी एका महिलेने जेवण बनवून टेबलावर ठेवले. परंतु, मजुरांपैकी काही मजुरांनी नुसार जेवण वाढण्यास सांगितले. जेवण बनवणाऱ्यांनी ते मान्य केले नाही. त्यांनी जेवण टेबलावर ठेवले त्यामुळे संतापलेल्या मजुरांनी टेबलावरील जेवणाला लाथ मारली. व महिलेसोबत गैरवर्तणूक केली.

सर्च करताना आम्हाला
नावाच्या एका स्थानिक वेबसाईटवरची बातमी मिळाली. या बातमीनुसार, याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज कुमार राय, मनोज कुमार राय आणि अशोक कुमार साहू अशी त्यांची नावे आहेत.

टाइम्स फॅक्ट चेकने साहरघाटचे SHO सुरेंद्र पासवान यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात दलिताचा कुठलाही अँगल नाही. काही लोकांना वाटत होते की, सोशल डिस्टेंसिंगप्रमाणे जेवण दिले पाहिजे. अंतर राखून जेवायला बसायला हवे, अशी काहींची मागणी होती. परंतु, असे न झाल्याने हा गदारोळ झाला आणि एका व्यक्तीने जेवणाला लाथ मारली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निष्कर्ष
दलित महिलेने जेवण बनवल्याने जेवणाला लाथ मारल्याचा जो व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. तो व्हिडिओ बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील आहे. या व्हिडिओचा आणि जाती-पातीचा काहीही संबंध नाही, असे ‘मटा ‘च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here