फेसबुकची मालकी असलेली व्हॉट्सअॅप WhatsApp कंपनी आपल्या युजर्संना चांगली सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. डार्क मोड फीचर असो की व्हिडिओ स्टेट्सच यासारखे नव – नवीन फीचर्स आणत असते. WhatsApp वेळो वेळी नवीन अपडेट घेऊन येत आहे. अपडेटमध्ये मिळणाऱ्या फीचर्समध्ये युजर्संना चॅटिंगमध्ये आणखी मजा यावी यासाठी कंपनी काम करत असते. WhatsApp फीचर्समधील नोटिफिकेशनवरून आपल्याला माहिती पडते. परंतु, काही फीचर्स असे असतात जे लवकर माहिती पडत नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला आज व्हॉट्सअॅपमधील खास आणि सीक्रेट फीचर्स संबंधीची माहिती देत आहोत. या ट्रिक्सच्या आणि फीचर्सच्या मदतीने व्हॉट्सअॅपमधील चॅटिंग आणखी मजा आणणारी ठरू शकते. व्हॉट्सअॅपची मजा वाढवणारी आणखी काही फीचर्स ज्यांची बऱ्याच जणांना माहिती नाही, या अशा फीचर्ससंबंधी आज जाणून घेऊयात….

व्हॉट्सअॅपवर तुम्ही काहीही टाईप न करता मेसेज पाठवू शकता. तयासाठी तुम्हाला गुगल असिस्टेंट किंवा सीरीला व्हॉईस कमांड द्यावे लागेल. याच्या माध्यमातून तुम्ही मेसेज वाचू पण शकतात. जर तुम्ही एखाद्या कामात व्यस्त असाल आणि तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना मेसेज पाठवायचा असेल तर टाईप करण्यात वेळ वाया घालवू नका. थेट गुगल अससिस्टेंटची मदत घेऊन तुम्हाला जे सांगायचे आहे. ते थेट बोला. तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत ते लवरक जाईल. तुमचे काम होईल व तुम्हाला मेसेज टाईप सुद्धा करावा लागणार नाही.

व्हॉट्सअॅप आल्यापासून अनेक जण स्वतःचा एक नवीन ग्रूप तयार करीत आहे. काहींना तर अनेक ग्रुप तयार करायची सवयच लागली आहे. तुम्हाला कुणीही उठसूट ग्रपमध्ये अॅड करू नये, यासाठी व्हॉट्सअॅपने खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सेटिंगच्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये दिलेल्या ग्रुप्स ऑप्शनवर जा. या ठिकाणी तीन ऑप्शन दिसतील. कोणीही तुम्हाला अॅड करू नये यासाठी Nobody हे सिलेक्ट करा. तर My contacts except या पर्याय खास आहे. तुम्हाला कोणी ग्रुपमध्ये अॅड करावे किंवा कुणी करू नये, हे तुम्ही ठरवू शकता.

व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑडियो मेसेजला व्हॉईस कॉलप्रमाणे ऐकण्यासाठी मेसेज प्ल करा. त्यानंतर फोनच्या इयरपीसला तात्काळ कानावर लावा. असे केल्यानंतर फोनचा ऑडियो मेन स्पीकर ऐवजी इयरपीस वरून येईल. आणि सर्वांना वाटेल की, तुम्ही फोनवर बोलत आहात. त्यामुळे व्हॉट्सअॅपची ही सुविधा अनेक जणांना माहिती नाही. हे सुद्धा तुम्ही एकदा ट्राय करू शकता.

व्हॉट्सअॅप चॅटला ईमेल मध्ये सेव्ह करता येऊ शकते. यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये दिलेल्या सेटिंग्समधील चॅट्स ऑप्शनमध्ये जा. या ठिकाणी हिस्ट्रीवर टॅप करा. त्यानंतर एक्स्पोर्ट चॅट Export Chat चा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल. याच्या मदतीने तुम्ही तुमची व्हॉट्सअॅप चॅटिंगला जीमेलमध्ये सेव्ह करता येऊ शकते. व्हॉट्सअॅपचे जगभरात कोट्यवधी लोक आहेत. दररोज एका ग्रुपमध्ये हजारो लोक चॅटिंग करीत असतात. त्यामुळे आपल्याला जे आवश्यक वाटत असेल ती चॅट तुम्ही मेलने सेव्ह करु शकता.

फिंगरप्रिंट लॉक फोनच्या फिंगरप्रिंट सेन्सर मेकनिजम सोबत मिळून काम करतो. याला अॅक्टिव करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये देण्यात आलेल्या प्रायव्हसी सेक्शनमध्ये जावे लागेल. या ठिकाणी देण्यात आलेल्या सर्वात खाली फिंगरप्रिंट लॉक करण्याचा ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप फिंगरप्रिंटने लॉक करू शकतात. असे केल्यास तुमची व्हॉट्सअॅपची चॅटिंग तुमच्या शिवाय अन्य दुसरा कुणीही व्यक्ती वाचू शकणार नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here