वाचाः
ट्विटरवर एसबीआयच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, अशा फेक एसएमएस पासून दूर राहा. जे तुम्हाला मोठ्या ऑफर्सची लालसा दाखवत असेल. किंवा महामारी करोना व्हायरस संबंधीत माहिती देणारी लिंक्स असेल. माहिती नसलेल्या लिंक्सला ओपन करू नका. ज्या लिंक्सचा सोर्स माहिती नाही अशा लिंक्स ओपन करू नका. किंवा डाऊनलोड करु नका. या लिंक्स तुमचे आर्थिक नुकसान करू शकतात. पोस्टमध्ये देशातील सर्वात मोठ्या पब्लिक सेक्टर बँकेने एक इमेज तयार करुन ती ट्विटरवर शेअर केली आहे. एसबीआयच्या ट्विटर पोस्टमध्ये ‘Cerberus Alert’ कॅप्शन दिले आहेत. ही नुकतीच रिलिज झालेली वेब सीरिज ‘पाताल लोक’ यासारखी वाटत आहे.
वाचाः
स्वर्ग, भूभाग आणि पाताल लोक
मोठी क्रिएटिव करीत एसबीआयने स्वर्ग लोक, भूभाग (जमीन), आणि पाताल लोक अशा तीन भागात विभागणी केली आहे. यात पाताल लोकच्या युजर्सला Cerberus ट्रोजन मेलवेअरला ऑनलाइन बँकिंग करणाऱ्या इन्फेक्टेड युजर्ससाठी पाताल लोक म्हटले गेले आहे. यात सांगितले की, स्वर्ग लोकचे असे युजर्स आहेत. ज्यांच्यावर नेहमी फ्रॉडची भीती असते. जमिनीवरचे लोक हे जे युजर्स आहेत. ज्यांना या मेलवेअर आणि धोक्याची माहिती आहे. तरी सुद्धा ते अज्ञांत लिंक्सवर क्लिक करतात. ते पाताल लोकांच्या युजर्संना इन्फेक्टेड झालेले आहेत.
बँकिंग डिटेल्सची चोरी
समोर आलेल्या ट्रोजन मेलवेअर म्हणजे युजर्संच्या बँकेमधील माहिती चोरी करण्याचे काम करते. या माहितीमध्ये क्रेडिट कार्ड नंबर, सीव्हीव्ही आणि बाकी डेटाचा समावेश आहे. त्यानंतर ट्रोजनच्या मदतीने पीडितांना लक्ष्य करण्यासाठी नंतर त्यांची पर्सनल माहिती आणि ट्रू फॅक्टर ऑथेंटिकेशन डिटेल्सची माहिती चोरी केली जाऊ शकते. करोना संसर्गामुळे लॉकडाऊन सुरु असल्याने हॅकर्स आधीच्या तुलनेत जास्त अॅक्टिव झाले आहेत. युजर्संना अज्ञात लिंकवर क्लिक न करण्याचे तसेच प्ले स्टोरमधून कोणतेही अॅप्स डाऊनलोड न करण्याची सूचना एसबीआयने आपल्या ग्राहकांना दिल्या आहेत.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times