व्हॉट्सअॅप हे युजर्ससाठी सर्वात जास्त चॅटिंग आणि मेसेजिंग करण्यासाठी सर्वात मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे. जगभरात कोट्यवधी युजर्स कम्युनिकेशन करण्यासाठी या टूलचा वापर करीत आहेत. परंतु, खूप सारे हॅकर्सही या प्लॅटफॉर्मच्या मदतीने फ्रॉड करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी जगभरातील अनेक हॅकर्संनी व्हॉट्सअॅपची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅपवर अनेक बनावट लिंक टाकून लोकांची माहिती हॅक केली जात आहे. त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. गेल्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियाने बँक खातेदारांना हॉट्सअॅपवर सुरू असलेल्या ओटीपी स्कॅम संदर्भात अलर्ट केले होते. सायबर क्रिमिनलपासून वाचण्यासाठी नेहमी अलर्ट राहणे गरजेचे आहे. व्हॉट्सअॅपवर या खास टिप्स तुम्हाला इंटरनेट आणि बँकिंग फ्रॉड पासून वाचवू शकतात.
कधीही व्हॉट्सअॅपवरून तुम्ही तुमच्या बँक संदर्भातील माहिती कोणालाही पाठवू नका. या अकउंट्सची डिटेल्स, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा पिन नंबर किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड्स चुकूनही पाठवू नका. युजर्संनी नेहमी अलर्ट राहायला हवे. कधीही छोटी-मोठी रकमेची देवाण-घेवाण करायची असेल तर आपल्या फोनवर आलेला वन टाइम पासवर्ड (OTP) चुकूनही व्हॉट्सअॅपवर कुणालाही पाठवू नका. कुणासोबत शेअर करू नका. अशी चूक तु्म्हाला चांगलीच महागात पडू शकते.
जर एखाद्या नंबरवरून तुम्हाला कोणी मीडिया फाईल पाठवली असेल तर ती फाईल चुकूनही डाऊनलोड करू नका. ही फाईल म्हणजे मॅलिशस फाईल असण्याची दाट शक्यता आहे. जर अशा वेळी तुमचा फोन चोरी झाला किंवा हरवाल असेल तर तात्काळ तुमचे व्हॉट्सअॅप डिअॅक्टिव करा. तुमचे व्हॉट्सअॅप डिअॅक्टिव करण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी दुसऱ्या फोनवरून व्हॉट्सअॅप लॉग इन करावे लागेल. त्यानंतर पहिल्या फोनवरून तुमचे व्हॉट्सअॅप डिअॅक्टिव होईल.
जर तुम्ही नवीन फोन विकत घेतला असेल तर जुना फोन विकण्याआधी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपधील डेटा पूर्णपणे साफ करा. तसेच सेटिंग्समध्ये जाऊन restore factory settings मधून डिव्हाईसमधील सर्व डेटा वाईप करा. बऱ्याचदा व्हॉट्सअॅपवर खोट्या ऑफर्स येतात. अशा मेसेजसोबत काही लिंक्स दिलेल्या असतात. अशा मेसेजला टॅप करण्याची चूक कधीच करू नका. तसेच कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या मेसेजला रिप्लाय देण्याच्या भानगडीत पडू नका. असे केल्यास तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अज्ञात कॉन्टॅक्ट कडून व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजला उत्तर देणे गरजेचे नाही. त्यांना चुकूनही उत्तर देऊ नका. तसेच त्यांनी पाठवलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करण्याची चूक करू नका. अशा मेसेजवर कधीही विश्वास ठेऊ नका. जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप पीसीला कनेक्ट करण्याचा दावा केला जात असेल तर तुम्हाला सांगितले जाईल की तुम्ही कम्प्यूटरवरून मेसेज पाठवू शकाल. परंतु, अशा अज्ञात व्यक्तीच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणे हेच शहाणपणाचे आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.
व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑटोमॅटिक मीडिया फाईल्स डाऊनलोड करण्याचा ऑप्शन डिसेबल करा. त्यानंतर कोणतीही मीडिया फाईल तुमच्या परवानगी विना डाऊनलोड होणार नाही. तसेच बऱ्याचदा आपण सार्वजनिक ओपन वायफाय नेटवर्कवर व्हॉट्सअॅपचा वापर करतो. शक्यतो हा वापर आपण टाळलेला बरा. कोणत्याही ठिकाणी फ्री वायफाय मिळतो म्हणून डाऊनलोड करणे, किंवा त्या फ्री वायफायचा वापर करणे संकट घेऊन येऊ शकते. कारण, यात हॅकिंगचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे अशा गोष्टीपासून आपण थोडे लांब राहायला हवे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times