नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने () आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना दररोज ५ जीबी डेटा मोफत देत आहे. हा कंपनीचा Work @ Home ब्रॉडबँड प्लान आहे. याचा फायदा ग्राहकांना कोणतेही चार्ज न देता घेती येवू शकतो. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातून वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने ही ऑफर आणली आहे. परंतु, बीएसएनएलच्या या ऑफरचा लाभ सध्या ज्यांच्याकडे लँडलाईन कनेक्शन आहे. अशाच युजर्संना मिळणार आहे. नवीन युजर्संना याचा फायदा मिळणार नाही.

वाचाः

जाणून घ्या काय आहे ऑफर

या ऑफरमध्ये ग्राहकांना दररोज ५ जीबी डेटा 10Mbps च्या स्पीडने मिळेल. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ५ जीबी डेटा संपल्यानंतर सुद्धा इंटरनेटचा वापर करता येणार आहे. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 1Mbps होईल.

कंपनीचा हा प्लान अंदमान निकोबार सह सर्वच सर्कलमध्ये लागू आहे. प्लानमध्ये कोणत्याही प्रकारचे इंन्स्टॉलेशन किंवा महिन्याला चार्ज आकारला जात नाही. ही ऑफर केवळ सध्या जे लँडलाईन युजर्स आहेत. ज्यांच्याकडे आता ब्रॉडबँड कनेक्शन नाही आहे, त्याच युजर्संना ही ऑफर मिळणार आहे.

वाचाः

अशी मिळवा फ्री ऑफर

कंपनीने आपल्या वेबसाईटवर ही ऑफर झळकावली आहे. या बॅनरवर लिहिलेय की, प्लानचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांनी टोल फ्री नंबर 18005991902, किंवा 18003451504 वर कॉल करावा लागेल. या प्लानमध्ये केवळ डेटाची सुविधा मिळते. कॉलिंगची नाही. हे या प्लानचे खास वैशिष्ट्ये आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here