Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन अगदी दोन दिवसांवर आले आहे. बहिण-भावाचे नाते खास असते. बहिण भावाच्या अतूट नात्याचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) सणाची ओळख आहे. तुम्ही देखील रक्षाबंधनला बहिणीसाठी काहीतरी खास गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगल्या वस्तू उपलब्ध आहेत. रक्षाबंधनला (Raksha Bandhan 2022) बहिणीला स्मार्टफोन गिफ्ट देणे एक चांगला पर्याय आहे. बाजारात अगदी कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अगदी १५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही एकापेक्षा एक चांगले फोन्स खरेदी करू शकता. या बजेटमध्ये तुम्ही Samsung Galaxy M13 5G, Motorola Moto G52, OPPO A74 5G, Realme Narzo 50 आणि Xiaomi Redmi Note 10T सारखे फोन्स खरेदी करू शकता. रक्षाबंधनला (Raksha Bandhan 2022) गिफ्ट देण्यासाठी चांगले पर्याय असलेल्या या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Samsung Galaxy M13 5G

samsung-galaxy-m13-5g

Samsung Galaxy M13 5G मध्ये Exynos 850 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये ६.६ इंच Full HD+ डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. तर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळतो. यात ६ जीबीपर्यंत रॅम, १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोनच्या ४ जीबी व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आणि ६ जीबी मॉडेलची किंमत १३,९९९ रुपये आहे.

वाचा: एकच नंबर! LG ते Samsung… बंपर डिस्काउंटसह मिळतायत मोठ्या स्क्रीनसह येणारे स्मार्ट टीव्ही, पाहा लिस्ट

​Motorola Moto G52

motorola-moto-g52

मोटोचा हा फोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह येतो. यात ६.६० इंच Full HD+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. तर फोटोग्राफीसाठी रियरला ५० मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनच्या ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे.

​OPPO A74 5G

oppo-a74-5g

ओप्पोच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 480 5G प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात ६.४९ इंच Full HD+ डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोनची किंमत १४,९९० रुपये आहे.

वाचा: ‘या’ शॉर्टकट Keys च्या मदतीने मिनिटात होईल लॅपटॉपवरील काम, स्क्रीनशॉटही काढू शकता; पाहा डिटेल्स

​Realme Narzo 50

realme-narzo-50

Realme Narzo 50 मध्ये मीडियाटेक हीलियो जी९६ प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात ६.६ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात फोटोग्राफीसाठी रियरला ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनची सुरुवाती किंमत १२,९९९ रुपये आहे. Realme च्या या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

​Xiaomi Redmi Note 10T

xiaomi-redmi-note-10t

Redmi Note 10T मध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात ६.५ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात रियरला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला असून, यामध्ये ४८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेजसह येतो. फोनच्या ४ जीबी मॉडेलची किंमत ११,९९९ रुपये आहे.

वाचा: Jio चा सर्वात स्वस्त प्लान, देशभरात अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा आणि SMS फ्री; पाहा किंमत-फायदे

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here