Cash For Phone

कॅश फॉर फोन हा या गेममधील नवीन प्लेयर आहे. परंतु त्याच्या सोप्या प्रक्रियेमुळे त्याने इतर अनेक स्पर्धकांना मागे टाकले आहे. या वेबसाइटला भेट देऊन, तुम्ही तुमच्या फोनच्या ब्रँड आणि मॉडेलचे तपशील थेट प्रविष्ट करू शकता आणि त्या बदल्यात तुम्हाला किती पैसे मिळू शकतात ते तपासू शकता. हे विक्री मूल्य जाणून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे लॉग इन करण्याची किंवा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही.मोबाइल विकून नवीन फोन घ्यायचा असेल तर या वेबसाईट्स बेस्ट आहेत.
Cashify

गेल्या काही वर्षांत, कॅशिफायने सेकंड हँड स्मार्टफोनच्या खरेदी आणि विक्रीमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. ही वेबसाइट जुने आणि वापरलेले स्मार्टफोन खरेदी आणि विक्री देखील करते. Cashify ची चांगली गोष्ट म्हणजे या वेबसाइटवर काही स्टेप्समध्ये तुमच्या मोबाईलची किंमत किती आहे हे सांगितले जाते. यामुळे युजर्सला फोन विक्रीचा निर्णय घेणे खूप सोपे होते. जुना स्मार्टफोन विकून जर नवीन फोन खरेदी करायचा विचार असेल तर या वेबसाईटची मदत तुम्ही घेऊ शकता. यावर तुम्हाला चांगली डील मिळू शकते.
OLX

OLX, हे नाव कुणालाच नवीन नाही. OLX हे वापरलेल्या वस्तू विकण्याची आणि खरेदी करण्याची जुनी जागा आहे. यावर अनेक प्रकारच्यवा वस्तूंची खरेदी आणि विक्री केली जाते. जर आपण फक्त मोबाईल फोनबद्दल बोललो, तर हे व्यासपीठ खरेदी करणारी व्यक्ती आणि विक्रेता यांच्यात थेट संपर्क साधते. ज्या व्यक्तीला त्याचा सेकंड हँड फोन विकायचा आहे तो OLX वर सर्व तपशील लिहितो आणि ज्या व्यक्तीला फोन विकत घ्यायचा आहे तो थेट विक्रेत्याशी बोलू शकतो आणि बोलणी करू शकतो.
वाचा: रिचार्जच्या किमतीत घरी न्या Samsung Galaxy M13, मिळतेय आतापर्यंतची बेस्ट डील, पाहा ऑफर
Flipkart

Flipkart / 2Gud : जर तुम्हाला तुमचा फोन विकायचा असेल . पण, फोनची योग्य किंमत मिळणार की, नाही याबद्दल शंका असेल तर तुम्ही Flipkart / 2Gud चा विचार करू शकता. Amazon प्रमाणे, Flipkart देखील नवीन स्मार्टफोनच्या विक्रीवर एक्सचेंज ऑफर देते. इथेही तुम्ही तुमचा जुना मोबाईल नवीन फोन खरेदी करताना एक्सचेंजमध्ये दिला तर, तुम्हाला चांगली सूट मिळते. Flipkart ची Toogood नावाच्या वेबसाइटसह भागीदारी देखील आहे. जी वापरलेले फोन खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करते.
Amazon

अॅमेझॉन : जर तुम्हाला तुमचा सेकंड हँड मोबाईल विकून नवीन स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन एक चांगला पर्याय आहे. या शॉपिंग साइटवर, तुम्हाला वापरलेल्या स्मार्टफोनच्या बदल्यात पैसे तर मिळत नाहीत. परंतु, एक्सचेंज ऑफरच्या स्वरूपात, ही वेबसाइट नवीन फोनच्या खरेदीवर जोरदार सूट देते. तुम्हाला कोणता नवीन स्मार्टफोन घ्यायचा याची खात्री असल्यास, तुम्ही तुमच्या जुन्या फोनसाठी Amazon India वर सर्वोत्तम मूल्य मिळवू शकता. म्हणून जुना स्मार्टफोन विकायचा असल्यास आधी अॅमेझॉनबद्दल नक्की माहिती मिळवा.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times