Best Jio OTT Plans : इतर देशांप्रमाणे आता भारतातही OTT पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती ना कोणत्या वेब सिरीज किंवा चित्रपटावर चर्चा करत असतो. अशात OTT फॅन्स एक नाही तर अनेक OTT चे सदस्यत्व घेतात. त्यामुळे त्यांचा खर्चही वाढतो. तसे, देशात अनेक ओटीटी आहेत. पण, Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar हे सर्वांचे आवडते OTT आहेत. सगळ्यांना माहित असल्या प्रमाणेच Jio कंपनी अनेक रेंजमध्ये विविध प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स सादरकरते. कंपनीकडे एकापेक्षा एक भन्नाट प्रीपेड प्लान्स तर आहेतच. पण, कंपनी पोस्टपेड प्लानमध्ये मोफत OTT सबस्क्रिप्शन देखील देते. तर, आज आम्ही सांगणार आहोत की Jio युजर्स फक्त एका प्लॅनमध्ये या तीन OTT चे मोफत सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकतात.

Jio 1499 Plan

jio-1499-plan

जीओचा १४९९ रुपयांचा प्लान: तुमचे बजेट जर थोडे अधिक असेल आणि तुम्ही १००० पेक्षा जास्त पैसे खर्च करण्यास तयार असाल तर हा चांगला प्लान आहे. कारण, १४९९ रुपयांचा प्लान हा Jio चा सर्वात महागडा प्लान आहे. या प्लानची किंमत १४९९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दरमहा ३०० जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा : Smartphone Offers : OMG ! अवघ्या ४९९९ रुपयांत मिळतोय OnePlus चा ‘हा’ शानदार स्मार्टफोन, फोनमध्ये युनिक फीचर्स

Jio 999 Plan

jio-999-plan

जीओचा ९९९ रुपयांचा प्लान: हा प्लान देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या प्लॅनची किंमत ९९९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दरमहा २०० जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा :Best iPhone Offers : iPhone खरेदीची योग्य वेळ ! १९,००० रुपयांनी स्वस्त झाले ‘हे’ टॉप मॉडेल्स, जाणून घ्या ऑफर

Jio 799 Plan

jio-799-plan

जीओचा ७९९ रुपयांचा प्लान: या पोस्टपेड प्लानची किंमत ७९९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दरमहा १५० GB डेटा मिळतो. यासोबतच, अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ देखील यामध्ये मिळेल. एसएमएस बेनिफिट्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. सोबतच यात ओटीटी फायदे देखील मिळतील. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा :रिचार्जच्या किमतीत घरी न्या Samsung Galaxy M13, मिळतेय आतापर्यंतची बेस्ट डील, पाहा ऑफर

Jio 599 Plan

jio-599-plan

जीओचा ५९९ रुपयांचा प्लान: २९९ रुपयांपेक्षा थोडी अधिक किंमत असणाऱ्या या प्लानची किंमत ५९९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दर महिन्याला १०० GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. ५९९ रुपयांच्या या प्लानमध्येही अनेक जबरदस्त फायदे देण्यात येतात. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबतच Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा:Amazon-Flipkart वर शॉपिंग करतांना ऑफर्सच्या नादात ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल तर नुकसान होणारच, ‘असे’ राहा सेफ

Jio 399 Plan

jio-399-plan

जीओचा ३९९ रुपयांचा प्लान: तुमचे बजेट जास्त नसेल तर, ३९९ रुपयांचा प्लान एक चांगला पर्याय आहे. स्वस्तात मस्त या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. या प्लानमध्ये यूजर्सना दरमहा ७५ GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील दररोज उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. यासोबतच, Jio Tv, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या सुविधाही मोफत उपलब्ध आहेत.

वाचा: Amazon Sale: सर्वात मोठा Price Drop ! खूपच कमी झाली ५००० mAh बॅटरीसह येणाऱ्या ‘या’ बजेट स्मार्टफोनची किंमत

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here