Best Smartwatch : ई-कॉमर्स साइट Amazon वर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलचे (Amazon Great Freedom Festival sale) आयोजन करण्यात आले आहे. ६ ऑगस्टपासून सुरू झालेला हा सेल १० ऑगस्टपर्यंत चालेल. रक्षाबंधन, १५ ऑगस्टच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सेलचा तुम्ही फायदा घेऊ शकता. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्टवॉचसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्ही जर रक्षाबंधनच्या (Raksha Bandhan) निमित्ताने तुमच्या बहिणीसाठी खास गिफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर स्मार्टवॉच चांगला पर्याय ठरेल. या सेलमध्ये ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. या किंमतीत तुम्ही Amazfit Bip 3, Boat Wave Lite, Fire-Boltt Phoenix, Redmi Watch 2 Lite आणि Fire-Boltt Ring 3 सारख्या वॉचला खरेदी करू शकता. रक्षाबंधन गिफ्ट (Raksha Bandhan Gift) देण्यासाठी या वॉच चांगला पर्याय आहेत. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Amazfit Bip 3

amazfit-bip-3

Amazfit Bip 3 स्मार्टवॉचमध्ये १.६९ इंच शानदार डिस्प्ले दिला आहे. ही स्मार्टवॉच ६० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोडसह येतो. पाण्यापासून सुरक्षेसाठी वॉचला ५एटीएम रेटिंगसह येतो. सिंगल चार्जमध्ये या वॉचला तुम्ही १४ दिवस सहज वापरू शकता. Amazfit Bip 3 स्मार्टवॉच PAI मॉनेटरिंग टेक्नोलॉजी दिली असून, याद्वारे ब्लड-ऑक्सिजन लेव्हल, हार्ट रेट, स्ट्रेस आणि स्लीप मॉनिटरिंगची सुविधा मिळते. ४० टक्के डिस्काउंटनंतर या वॉचला २,९९८ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: ५जी स्मार्टफोन खरेदी करायचाय? कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ फोन्सची लिस्ट पाहाच

​Boat Wave Lite

boat-wave-lite

Boat Wave Lite स्मार्टवॉचमध्ये १.६९ इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. वॉचमध्ये अनेक हेल्थ फीचर्स दिले आहेत. हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंगची देखील यात सुविधा मिळते. पाण्यापासून सुरक्षेसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. यात वेगवेगळे स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये या वॉचला तुम्ही ७ दिवस वापरू शकता. Boat Wave Lite स्मार्टवॉचला ७९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,४९८ रुपयात खरेदी करू शकता.

​Fire-Boltt Phoenix

fire-boltt-phoenix

ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या Fire-Boltt Phoenix स्मार्टवॉचमध्ये १.३ इंच डिस्प्ले दिला आहे. यामध्ये कॉलिंगसाठी इंटर्नल स्पीकर आणि मायक्रोफोनची सुविधा दिली आहे. यामध्ये कॉन्टेंट सिंक करण्यासाठी डायल पॅडची देखील सुविधा मिळते. तसेच, SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटरिंगची देखील सुविधा यात दिली आहे. वॉच आयपी६८ वॉटरप्रुफ रेटिंगसह येते. यात १२० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड आहेत. वॉचला फक्त १,८९८ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: एका महिन्यात तुमच्या हातात असेल iPhone 14, जाणून घ्या किती पैसे खर्च करावे लागतील?

​Redmi Watch 2 Lite

redmi-watch-2-lite

Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉचमध्ये १.५५ इंच एचडी एड्ज डिस्प्ले दिला आहे. यात ट्रॅकिंगसाठी मल्टी-सिस्टम स्टँडअलोन जीपीएस टेक्नोलॉजी दिली आहे. याशिवाय, SpO2 लेव्हल, हार्ट रेट, स्ट्रेस, स्लीप सारखे अनेक हेल्थ फीचर्स देखील मिळतात. वॉच ५एटीएम वॉटर रेसिस्टेंट आहे. यात १०० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट मिळेल. Redmi Watch 2 Lite वॉचला ४४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ४४९८ रुपयात खरेदी करू शकता.

​Fire-Boltt Ring 3

fire-boltt-ring-3

Fire-Boltt Ring 3 मध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला आहे. ही वॉच ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येते. यामध्ये ११८ पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट मिळतो. याशिवाय, SpO2 आणि हार्ट रेट मॉनिटरिंगची सुविधा दिली आहे. Fire-Boltt Ring 3 मध्ये तुम्हाला इन-बिल्ट वॉइस असिस्टेंट, एक कॅलक्यूलेटर आणि गेम सारखे फीचर्स मिळतील. वॉच आयपी६७ वॉटरप्रुफ रेटिंगस येते. Fire-Boltt च्या या स्मार्टवॉचला ६५ टक्के डिस्काउंटनंतर ३,४९८ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: पंतप्रधान मोदी ‘या’ दिवशी देशात लाँच करू शकतात ५जी, मुंबई-पुण्यात सर्वातआधी सुरू होणार सेवा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here