नवी दिल्लीः इन्स्टंट मेसेजिंग अॅप मध्ये इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटसारखे नवीन फीचर आले आहे. आता नवीन कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यासाठी तुम्हाला नंबर टाईप करण्याची किंवा सेव्ह करण्याची गरज नाही. बस केवळ एका QR कोड स्कॅन करताच नवीन नंबर मोबाइलमध्ये सेव्ह होईल. व्हॉट्सअॅपने या नवीन फीचरला अँड्रॉयड आणि iOS च्या लेटेस्ट बिटा व्हर्जन मध्ये द्यायला सुरुवात केली आहे. याला लवकरात लवकर स्टेबल व्हर्जनसाठी रोलआऊट करण्यात येईल.

वाचाः

याप्रमाणे काम करणार हे फीचर
हे फीचर आल्यानंतर युजर्सच्या कॉन्टॅक्ट क्यूआर कोडमध्ये दिसेल. या क्यूआर कोडमध्ये तुमचा नंबर लपलेला असतो. जर तुम्हाला तुमचा एखादा नंबर आपल्या व्हॉट्सअॅपला जोडायचा असेल तर तुम्हाला केवळ त्याचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. बिटा व्हर्जनमध्ये QR कोड पाहण्यासाठी आणि स्कॅन करण्यासाठी पर्याय व्हॉट्सअॅपच्या सेटिंग मेन्यू Settings menu मध्ये दिला आहे.

तुम्ही सेटिंगवर टॅप केल्यास तुम्हाला तुमच्या प्रोफाईल च्या बाजुला QR कोडचा आयकॉन दिसेल. यावर टाईप केल्यानंतर तुम्हाला तुमचा क्यूआर कोड दिसेल. जर तुम्हाला तुमचा नंबर जोडायचा असेल तर हाच क्यूआर कोड त्यांच्या मदतीला येईल. त्यानंतर त्याच्या बाजुला तुम्हाला Scan Code चा पर्याय सुद्धा दिसेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here