Best Budget Smartphones Offers: Amazon India वर सुरु असलेला ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल १० ऑगस्ट रोजी संपणार आहे. सेल संपण्यापूर्वी कंपनी यूजर्सना अनेक उत्तम ऑफर्स आणि डिस्काउंट देत आहे. ब्लॉकबस्टर डील देखील त्यापैकीच एक. Amazon India च्या ब्लॉकबस्टर डीलमध्ये, तुम्ही बजेट सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स मोठ्या सवलतींसह खरेदी करू शकता. त्याच वेळी, जर तुम्ही फोन खरेदी करण्यासाठी SBI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला २ हजार रुपयांपर्यंत त्वरित सूट देखील मिळेल. याशिवाय, विक्रीत पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांना फ्लॅट १० % कॅशबॅक देखील दिला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया बजेट स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या टॉप ५ ब्लॉकबस्टर डील्सबद्दल. redmi 9 Activ , Samsung Galaxy M13, realme narzo 50A, Oppo A31, टेक्नो पॉप 5 LTE वर उपलब्ध डील्स पाहा.

Samsung Galaxy M13

samsung-galaxy-m13

Samsung Galaxy M13: सॅमसंगचा हा नवीन बजेट स्मार्टफोन ११,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह येतो. SBI क्रेडिट कार्डधारकांना या फोनवर २००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. तुम्ही हा सॅमसंग फोन एक्सचेंज ऑफरमध्ये देखील खरेदी करू शकता. कंपनी फोनवर ११,३००० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज ऑफर करत आहे. या फोनमध्ये १२ GB पर्यंत RAM (RAM Plus वैशिष्ट्यासह) ५० MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी ६००० mAh आहे. Samsung Galaxy M13 मध्ये ६.६ इंचाचा डिस्प्ले आहे.

वाचा : ऑनलाईन पेमेंटसाठी मोठ्या वापरले जाणारे QR Code नक्की आहे तरी काय? कसे होते यावर काम, पाहा डिटेल्स

​Tecno Pop 5 LTE

tecno-pop-5-lte

Tecno Pop 5 LTE: हा Tecno स्मार्टफोन फक्त ६,३९९ रुपयांमध्ये या सेलमध्ये तुमचा असू शकतो. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ६३९ रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळेल. फोनवर ६०५० रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंटही दिले जात आहे. हा टेक्नो फोन 2 GB रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. फोनमध्ये तुम्हाला ६.५२ -इंचाचा डिस्प्ले आणि पॉवरसाठी यात ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बजेट किमतीमधील हा फोन गिफ्ट देण्याकरिता एक चांगला पर्याय आहे.

वाचा : Battery Tips: स्मार्टफोन एकदाच चार्ज करा आणि दिवसभर चार्जिंगचे टेन्शन विसरा, पाहा ट्रिक्स

Redmi 9 Activ

redmi-9-activ

Redmi 9 Activ: अॅमेझॉनच्या ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही हा फोन सर्वोत्तम ऑफरमध्ये खरेदी करू शकता. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन ८९९९ रुपयांच्या सेलमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. यावर तुम्हाला ६५० रुपयांचे कूपन डिस्काउंट मिळेल. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला ८९९ रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. हा फोन ८५०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी केला जाऊ शकतो. हा Redmi फोन १३ -मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि ६.५३ -इंचाच्या HD+ डिस्प्लेसह सुसज्ज आहे.

वाचा: Smartphone Camera: ‘या’ चुकांमुळे लवकर खराब होऊ शकतो तुमच्या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा, अशी घ्या काळजी

Oppo A31

oppo-a31

Oppo A31 : 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला Oppo A31 फोन तुम्ही सेलमध्ये ११,९९० रुपयांना खरेदी करू शकता. या फोनवर, एसबीआय कार्डने नॉन ईएमआय पेमेंटवर ७५० रुपये आणि ई एमआय व्यवहारावर १२५० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ११,३०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह हा फोन तुमचाही असू शकतो. Oppo A31 मध्ये तुम्हाला १२ -मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल. कमी किमतीत हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

वाचा : Amazon-Flipkart Sale: कोण वरचढ ? कोणती साईट देतेय स्मार्टफोनवर बेस्ट डील ? पाहा ऑफर्सची लिस्ट

Realme Narzo 50A

realme-narzo-50a

Realme narzo 50A: 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत सेलमध्ये १२,४९९ रुपये आहे. Company या फोनवर १००० रुपयांची कूपन सूट देत आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंत आणखी सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये Realme narzo 50A घेतल्यास तुम्हाला ११,६५० रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. Realme या फोनमध्ये ६००० mAh बॅटरी, Media Tek Helio G85 प्रोसेसर आणि ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देत आहे.

वाचा: Har Ghar Tiranga :अभियानात सहभागी व्हा आणि सर्टिफिकेट, मिळवा, असे करा डाउनलोड

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here