भारतातील चौथा लॉकडाऊन ३१ मे रोजी संपणार आहे. चौथा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने मोबाइल कंपन्यांना स्मार्टफोनची विक्री करण्यास काही अटीवर परवानगी दिली होती. भारतातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोनची लाँचिंग करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच कंपन्यांनी फोनची लाँचिंग आणि विक्री ऑनलाइन सुरु केली आहे. ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करायचा तुमचा विचार असेल आणि कोणता स्मार्टफोन चांगला आहे. किंवा कोणता खरेदी करू असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या फोनची वैशिष्ट्ये एकदा पाहा. ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या सर्वच फोनमध्ये चांगले फीचर दिले जातात. जाणून घ्या ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोनविषयी….
रेडमी ८ ए या स्मार्टफोनमध्ये ६.२२ इंचाचा डिस्प्ले आणि वॉटरड्रॉप नॉच दिला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. यूएसबी टाईप सी पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. ज्यांचे बजेट कमी असेल अशा युजर्संसाठी हा फोन चांगला आहे.
रियलमी सी३ हा स्मार्टफोन सुद्धा ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतो. या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला जातो. जबरदस्त लूक असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ६.५२ इंचाचा मोठा डिस्प्ले, फ्रंट कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यासारखे फीचर्स दिले आहेत. या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. भारतात या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. तुमचे कमी बजेट असेल तर हा फोन खरेदीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.
मायक्रोमॅक्सच्या या स्मार्टफोनची किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. या फोनमध्ये ५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा रियर आणि ड्युअल फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.
लिनोओच्या या स्मार्टफोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. फोनचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या साहायाने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकतो. या फोनमध्ये ५.४५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. कमी बजेट असलेल्या युजर्संसाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.
विवोच्या वाय ९१ आय या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ६.२२ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर व ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून ७ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. हँडसेटला पॉवर देण्यासाठी या फोनमध्ये ४०३० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times