सध्या बाजारात सर्व रेंज आणि सेगमेंटचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यात अनेक स्मार्टफोन असे आहेत की, जे कमी किंमतीत असूनही त्या स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. परंतु, तुमचे बजेट कमी आहे. तर अशावेळी तुम्हाला कमी किंमतीतही चांगला स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. कमी बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन खरेती करायचा विचार तुमच्या मनात आला असेल तर आम्ही तुम्हाला मदत करु शकतो. या ठिकाणी आम्ही तुम्हाला ५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील काही स्मार्टफोन संबंधीची माहिती देत आहोत. या किंमतीत चांगले फीचर्स असलेले नोकिया कंपनीपासून चीनच्या शाओमी कंपनी पर्यंतच्या स्मार्टफोनचा यात समावेश आहे. जाणून घ्या. या फोनसंबंधी….

नोकियाच्या या फोनची किंमत केवळ ३ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि मीडियाटेक चिपसेट दिला आहे. या फोनमध्ये २१५० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमधील बॅटरी काढता येऊ शकते. या फोनमध्ये ४.५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. क्वॉड को, १.१ गीगाहर्ट्ज, मीडियाटेक एमटी ६७३७ दिला आहे.

चीनची कंपनी शाओमीच्या रेडमी गो या फोनची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. या फोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ४२५ दिला आहे. या फोनमध्ये १ जीबी रॅम दिला आहे. तसेच या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचा पिक्सल रिझॉल्यूशन ७२०x१२८० आहे. तर याचा आस्पेक्ट रेश्यो १६:९ आहे. या फोनमध्ये १.४ गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड सोबत क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर दिला आहे.

मायक्रोमॅक्सच्या भारत गो या फोनची किंमत ४ हजार ३९९ रुपये आहे. या फोनमध्ये १ जीबी रॅम आणि मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी क्षमता २००० एमएएच आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४जी VoLTE सह ड्युअल सिम, अँड्रॉयड ओरियो, ४.५ इंचाचा डिस्प्ले, क्वॉडकोर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी स्टोरेज. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

या फोनची किंमत ४ हजार ४४९ रुपये आहे. या फोनमध्ये ५.४५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. २ जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये रियरमध्ये १३ मेगापिक्सलचा आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ५.४५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याची रिझॉल्यूशन पिक्सेल ७२०x१४४० आहे. फोनमध्ये १.३ जीएचझेड क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे.

लावाचा झेड ६१ फोनमध्ये १ जीबी रॅम आणि मीडियाटेक प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ५.४५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनची इंटरनल मेमरी १६ जीबी आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. या फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. स्वस्तात मस्त फोन खरेदी करण्यासाठी या फोनचा विचार करायला काहीच हरकत नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here