WhatsApp युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी कंपनी प्रत्येक वेळी काहींना काही नवीन करण्याचा प्रयत्न करीत असते. व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअपचे २ अब्जहून अधिक युजर्स आहेत. WhatsApp ने याआधी व्हॉट्सअॅपमध्ये डार्क मोड फीचर आणले होते. तसेच फेक न्यूजला आळा बसावा यासाठी फॉरवर्डेड मेसेजची मर्यादा कमी केली होती. व्हॉट्सअॅप कंपनीने ३० सेकंदाच्या व्हिडिओ स्टेट्स ऐवजी १५ सेकंदाचा केला होता. व्हॉट्सअॅप कंपनी पुन्हा एकदा लवकरच नवीन फीचर लाँच करणार आहे. युजर्संची या नवीन फीचरमुळे चॅटिंगची मजा डबल होणार आहे. व्हॉट्सअॅपमधील लेटेस्ट अपडेटद्वारे डिव्हाईसपर्यंत पोहोचते. या अपडेट्समध्ये काही असेही असतात. जे युजर्संकडून चुकून राहतात. त्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला काही खास सीक्रेट व्हॉट्सअॅप ट्रिक्स संबंधी माहिती देणार आहोत…जाणून घ्या…
व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट यादीत शेकडो जणांचे नंबर असू शकतात. परंतु, यात कोणी तरी एक असतो ज्याच्यासोबत तुम्ही सर्वात जास्त चॅटिंग करीत असतात. तो कोण आहे. याची माहिती मिळावी यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये एक सेटिंग देण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये डेटा अँड स्टोरेज युसेज सेक्शन जावे लागेल. या ठिकाणी स्टोरेजवर टॅप करावे लागेल. असे केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वात जास्त चॅटिंग आणि मीडिया फाईल्स एक्सचेंज करता येऊ शकतात.
व्हॉट्सअॅपमध्ये तुम्ही सर्वात जास्त ज्याच्यासोबत चॅटिंग करतात. त्या फोनला होमस्क्रीनवर आणले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला होमस्क्रीन शॉर्टकट फीचर देते. याला अॅक्टिव करण्यासाठी चॅटला थोडे वेळासाठी प्रेस करून ठेवावे लागेल. असे केल्यानंतर हॅमबर्गर मेन्यू वर टॅप करावे लागेल. त्यानंतर ‘Add chat shortcut’ हे सिलेक्ट करावे लागेल. असे केल्यानंतर तुम्हाला चॅटिंग करण्यासाठी शॉर्टकट उपलब्ध होईल. व्हॉट्सअॅपची ही सुविधा काही जणांना माहिती नाही.
व्हॉट्सअॅप द्वारे तुम्ही तुमची लोकेशन पाठवू शकता. तसेच दुसऱ्यांना लोकेशन मागू शकता. लोकेशन पाठवण्यासाठी चॅट विंडो ओपन करा. टेक्स्ट बॉक्समध्ये जा. या ठिकाणी अटॅचमेंटवर टॅप करून लोकेशन सिलेक्ट करा. जर तुम्ही स्वतः कुठे जात असला तर याची लाईव्ह लोकेशन सुद्धा तुम्ही पाठवू शकता. याच्या मदतीने रियल टाईम लोकेशन संबंधी त्या कॉन्टॅक्टला लागोपाठ माहिती मिळत राहते. ज्याला तुम्ही हा मेसेज पाठवला आहे. या लोकेशन फीचर मुळे अनेकांना फार मोठा फायदा होत आहे. फोन करीत बसण्यापेक्षा केवळ लोकेशन पाठवल्याने तुमचे काम सोपे होऊन जाते.
व्हॉट्सअॅप तुम्हाला मेसेज बुकमार्क करण्याची सुविधा देते. याचा फायदा हा आहे की, तुम्ही काही खास मेसेजला खूप मोठ्या चॅटिंगनंतरही सहज सर्च करु शकता. मेसेज बुकमार्क केल्यानंतर त्याला थोड्या वेळासाठी होल्ड करु शकता. असे केल्यानंतर वरच्या भागात स्टार आयकॉन दिसेल त्याला टॅप करा. असे केल्यानंतर तो मेसेज बुकमार्क होईल. त्यानंतर तो मेसेज शोधण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. तो लगेच तुम्हाला सापडेल व तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत चॅटिंग करायला मोकळे असाल.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times