स्मार्टफोन, फीचर फोन, लॅपटॉप

स्मार्टफोन, फीचर फोन, लॅपटॉप किंवा अन्य दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्ससाठी तुम्हाला वेगवेगळ्या चार्जरचा वापर करावा लागतो. परंतु, लवकरच या समस्येपासून तुमची सुटका होऊ शकते. सरकार फक्त दोन प्रकारच्या चार्जरचा वापर करण्यावर विचार करीत आहे. म्हणजेच भारतात तुम्हाला फक्त दोन प्रकारचे चार्जिंग पोर्ट्स पाहायला मिळू शकतील. या निर्णयानंतर नवीन चार्ज खरेदी करण्याची गरज भासणार नाही. नुकतीच यूरोपीय यूनियनने याप्रकारचे पाऊल उचलले आहे. आता त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्ससाठी फक्त एकच चार्जर पोर्ट मिळेल. यूईने टाइप सी चार्जर पोर्टला मंजुरी दिली आहे. या नियमाची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून केली जाणार आहे. भारतात सुद्धा असेच होण्याची शक्यता आहे.
वाचा: Xiaomi ची धमाकेदार ऑफर! तब्बल ६,००० रुपयांपर्यंत कमी झाली टीव्हीची किंमत, पाहा डिटेल्स
लवकरच होणार बैठक

कंज्यूमर अफेयर मिनिस्ट्रीने सर्व मुख्य इंडस्ट्री असोसिएशन आणि सेक्टर स्पेसिफिक ऑर्गेनाइझेशनची बैठक बोलावली आहे. ही बैठक १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या बैठकीत घरगुती वापरासाठी मल्टिपल चार्जिंगचा वापराला बंद करण्याची शक्यता आहे. कंज्युमर अफेयर सेक्रेटरी रोहित कुमार सिंग यांनी दोन आठवड्यापूर्वी या संबंधी एक लेटर इंडस्ट्री लीडर्स यांना लिहिले होते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रोहित यांनी भारतात जास्तीत जास्त कंज्युमर्स छोटे आणि मीडियम साइजचे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा वापर करतात. यात टाइप सी चार्जिंग पोर्ट दिले आहे. मोठ्या संख्येत यूजर्स फीचर फोनचा वापर करतात. जे वेगळ्या चार्जिंग पोर्ट सोबत येतात.
फक्त दोन प्रकारचे चार्जिंग पोर्ट असतील

त्यांनी सांगितले की, आपण फक्त दोन प्रकारच्या चार्जिंग पॉइंट्सवर काम सुरू करायला हवे. म्हणजेच एक चार्जिंग पोर्ट स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ईयरबड्स, स्पीकर सारख्या छोट्या आणि मीडियम साइजच्या डिव्हाइससाठी याचा वापर करायला हवा. तर दुसरे फीचर फोनसाठी वापर करण्यासाठी हवा.कारण, सध्या अनेक घरात एकापेक्षा जास्त स्मार्टफोन्स, लॅपटॉप असतात. त्या प्रत्येकासाठी वेगवेगळे चार्जर असतात. त्यामुळे एकच चार्जिंग पोर्ट ठेवले तर एकाच चार्जरने ते चार्ज करता येवू शकते.
वाचा: ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह Moto चा खूपच स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स
सर्वात जास्त परिणाम अॅपलवर

जर सरकार या पॉलिसीला लागू करीत असेल तर याचा सर्वात जास्त परिणाम अॅपल कंपनीवर पडेल. अॅपल आपल्या स्मार्टफोन्समध्ये लाइटनिंग केबलचा वापर करते. तसेच अॅपल आयफोन सोबत बॉक्स मध्ये चार्जर सुद्धा देत नाही. अॅपलला चार्जरच्या विक्रीतून मोठी कमाई होत असते. जर टाइप सी किंवा अन्य दुसऱ्या चार्जिंग पोर्टने आयफोन चार्ज करता आले तर अॅपल कंपनीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
वाचा: अवघ्या ८९९ रुपयात ‘या’ कंपनीचे शानदार नेकबँड इयरफोन लाँच, मिळेल ३२ तासांचा बॅटरी बॅकअप
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times