खासगी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने गेल्याकाही वर्षात आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला जोरदार टक्कर देत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहे. जिओला इतर कंपन्यांच्या तुलनेत कमी किंतीत जास्त बेनिफिट्स देणारे प्लान्स ऑफर करण्यासाठी ओळखले जाते. अगदी महिन्याभरापासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे असंख्या प्लान्स कंपनीकडे उपलब्ध आहेत. जिओच्या अनेक प्लान्समध्ये डेली डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि एसएमएससह ओटीटी बेनिफिट्स देखील मिळतात. काही प्रीपेड रिचार्ज प्लान्समध्ये १ वर्षासाठी डिज्नी+हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. जिओकडे वेगवेगळे सेगमेंटमधील Top Trending Plan उपलब्ध आहेत. या प्लान्सची किंमत २९९ रुपयांपासून ते २,९९९ रुपयांपर्यंत आहे. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Jio चा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

jio-

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे २९९ रुपये किंमतीचा शानदार रिचार्ज प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटाचा फायदा मिळेल. डेली डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा देखील फायदा मिळेल. या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

​Jio चा ३३३ रुपयांचा रिचार्ज प्लान

jio-

Jio च्या ३३३ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवस आहे. या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ४२ जीबी डेटाचा फायदा मिळेल. डेली डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. जिओच्या या प्रीपेड प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. तसेच, ३ महिन्यांसाठी डिज्नी+ हॉटस्टार आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

वाचा: ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह Moto चा खूपच स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

​Jio चा ४९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

jio-

जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये १ वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटाचा फायदा मिळेल. दररोज मिळणारा डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ६४ Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. यात देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जाते. याशिवाय, जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

​Jio चा ६६६ रुपयांचा रिचार्ज प्लान

jio-

Jio च्या ६६६ रुपयांच्या रिचार्ज प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १२६ जीबी डेटाचा फायदा मिळेल. प्लानमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा देखील फायदा मिळतो. याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएस देखील दिले जातात. Jio च्या या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ सारख्या जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.

वाचा: अवघ्या ८९९ रुपयात ‘या’ कंपनीचे शानदार नेकबँड इयरफोन लाँच, मिळेल ३२ तासांचा बॅटरी बॅकअप

​Jio चा ७१९ रुपयांचा रिचार्ज प्लान

jio-

Jio च्या ७१९ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १६८ जीबी डेटाचा फायदा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यावर ६४ केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जाते. याशिवाय, या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ सारख्या जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

​Jio चा २,९९९ रुपयांचा रिचार्ज प्लान

jio-

Jio च्या २,९९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये दररोज २.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळतो. प्लानची वैधता एक वर्ष म्हणजेच ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएस दिल जातात. यात १ वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. प्लानमध्ये जिओटीव्ही, जिओ सिनेमा सारख्या जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो.

वाचा: Flipkart Sale चा शेवटचा दिवस! स्वस्तात मिळतायत TV-AC आणि वॉशिंग मशीन; किंमत ६,९९९ रुपयांपासून सुरू

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here