स्मार्टफोनच्या मदतीने अनेक कामं सोपी झाली आहेत. घरात-ऑफिसात बसून मोबाइलवरून अनेक काम मिनिटाच्या आत केली जातात. मोबाइलवर सोशल मीडिया, टिकटॉक, व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, जीमेल यांसह अनेक सोशल मीडिया हाताळला जातो. काही जण तर तासनतास मोबाइलवर असतात. त्यामुळे मोबाइलची बॅटरी कमी होते. स्मार्टफोनची बॅटरी वाढवण्यासाठी आपल्याला अनेकदा चार्जिंगला फोन लावावा लागतो. परंतु, फोनला वारंवार चार्ज करणे कधी तरी अवघड होऊन जाते. कधी प्रवासात बॅटरी लवकर संपून जाते. त्यामुळे बॅटरी लवकर संपणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी. बॅटरी लवकर संपणार नाही. बॅटरी बॅकअप वाढेल यासाठी काही मोबाइलमध्ये खास ट्रिक्स आहेत. मोबाइलमधील सेटिंग्स बदलून बॅटरी लाईफ वाढवता येऊ शकते. केवळ पाच सोप्या टिप्स आहेत. याच्या मदतीने स्मार्टफोनच्या बॅटरीची लाईफ वाढवता येऊ शकते. पाहा….

लोकेशन सर्विस ऑन असल्याने बॅटरी वेगाने कमी होते. कारण, चांगली सुविधा देण्यासाटी जीपीएस प्रोसेसिंग पॉवरचा वापर करीत असते. गरज पडल्यास जीपीएस ऑन करा. परंतु, गरज नसेल तर तुमच्या मोबाइलमधील जीपीएस बंद केलेले कधीही चांगले. लोकेशन सर्विस ऑन किंवा ऑफ पर्याय याची निवड करायची असेल तर मोबाइलमधील सेटिंग्स मध्ये जा. त्या ठिकाणी क्विक सेटिंग्स टॉगल मध्ये तुम्हाला हा पर्याय मिळेल.

अँड्रॉयड डिव्हाईसेस आणि खूप साऱ्या अॅप आता डार्क मोडचा पर्याय देत असतात. ज्याच्या इंटरफेसवर डार्क मोड थीम अप्लाय होतो. जर स्मार्टफोनमध्ये AMOLED किंवा OLED स्क्रीन दिलेली असेल तर या मोडच्या मदतीने बॅटरी वाचवता येऊ शकते. त्यामुळे अशा डिस्प्लेंवर ब्लॅक कलरचा पिक्सल ऑफ होतो. तसेच बॅटरीचा वापर केला जात नाही. बॅटरी वाचवण्यासाठी गरज पडल्यास डार्क मोड इनेबल करा. याचा बॅटरी वाचवण्यात तुम्हाला नक्कीच मदत होईल.

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये एकत्र खूप सारे अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये अॅक्टिव असतील तर जास्त बॅटरी खर्च होत असते. कोणताही अॅप ओपन केल्यानंतर सरळ होम पेजवर गेल्यास अॅप बॅकग्राऊंडवर सुरुच असतो. काम संपल्यानंतर रिसेट अॅप्समध्ये अॅप्लिकेशन्स बंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन कोणताही अॅप सिलेक्ट करू शकता. अॅप सिलेक्ट केल्यानंतर ‘Don’t run in background’सुद्धा सिलेक्ट करू शकतात.

काही अॅप्समध्ये काही तरी बग किंवा कमतरता असते. त्यामुळे हे अॅप्स सर्वात जास्त बॅटरी खर्च करीत असतात. त्यामुळे तुम्हाला बॅटरी वाचवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. बॅटरीचा वापर करणाऱ्यांची मॉनिटरींग करा. यासाठी सेटिंग्समध्ये आणि बॅटरीत जा. त्या ठिकाणी पॉवर युजेसला टॅप करा. या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त बॅटरीचा वापर करणाऱ्या अॅप्सची यादी दिसेल. यातील तुम्हाला जे अॅप गरजेचे वाटत नसतील ते अनइन्स्टॉल करा. त्यामुळे तुमची बॅटरी वाचवण्यात मदत होईल.

मोबाइलमधील अनेक अॅप्स लाइट व्हर्जन प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत. कमी स्टोरेज शिवाय कमी बॅटरी आणि प्रोसेसिंग पॉवर सुद्धा देण्यात आलेले आहेत. या प्रमाणे प्रसिद्ध अॅप्स लाइट व्हर्जन डाऊनलोड करून तुम्ही तुमची बॅटरी वाचवू शकतात. काही अॅप्सला वेब बेस्ड इंटरफेसवर वापर केला जावू शकतो. त्यामुळे या साध्या-साध्या गोष्टी आपण आपल्या मोबाइलमध्ये लक्षपूर्वक वापरायला सुरुवात केली तर तुमच्या मोबाइलमधील बॅटरी बॅकअप चांगला राहिल. तुम्हाला वारंवार फोन चार्जिंग करण्याची गरज भासणार नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here