Bluei Truepods 5

Bluei Truepods 5 इयरबड्सची किंमत २,७९९ रुपये आहे. या बड्सला तुम्ही ब्लॅक आणि व्हाइट रंगात खरेदी करू शकता. यामध्ये IWP टेक्नोलॉजी आणि तीन नॉइज कॅन्सिलेशन मोड दिले आहेत. यामध्ये ३०० mAh ची मोठी बॅटरी मिळते. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी ६ ते ७ तास सहज टिकते. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्ही५.० टेक्नोलॉजीचा सपोर्ट दिला आहे. सोबतच, स्टीरियो कॉलिंग फीचर दिले आहे. यात बिल्ट-इन मायक्रोफोन, १० एमएम ड्राइव्हर आणि चार्जिंगसाठी टाइप-C पोर्टचा सपोर्ट मिळतो.
वाचा: अवघ्या ८९९ रुपयात ‘या’ कंपनीचे शानदार नेकबँड इयरफोन लाँच, मिळेल ३२ तासांचा बॅटरी बॅकअप
ZOOOK Rocker Twins

ZOOOK Rocker Twins ट्रू वायरलेस इयरबड्सची किंमत १,६१० रुपये आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट मिळतो. याची साउंड क्वालिटी शानदार आहे. विशेष म्हणजे एकाचवेळी दोन गॅजेट देखील याच्याशी कनेक्ट करू शकता. ZOOOK Rocker Twins ची कनेक्टिव्हिटी रेंज १० मीटर आहे. बड्स अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसला सपोर्ट करतात. यामध्ये गुगल वॉइस असिस्टेंट आणि सिरीचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच, याचे वजन खूपच कमी आहे.
Pebble Buds Pro

Pebble Buds Pro ला तुम्ही २,१४४ रुपयात खरेदी करू शकता. Amazon आणि Flipkart सेलमध्ये Pebble च्या या इयरबड्सला तुम्ही ऑफर्ससह स्वस्तात खरेदी करू शकता. यामध्ये एनवायरमेंट नॉइज कॅन्सिलेशन (ENC) सपोर्ट देखील मिळतो. या TWS इयरबड्समध्ये क्वॉड मायक्रोफोन्स देखील दिले आहेत. यात अल्ट्रा-लो लेटेंसी गेमिंग मोड आणि स्मार्ट ऑटो पॉज सेंसरचा सपोर्ट मिळतो. तसेच, ड्यूल ऑडिओ ड्राइव्हरद्वारे क्रिस्टल क्लिअर एचडी साउंडचा अनुभव मिळेल.
वाचा: Flipkart Sale चा शेवटचा दिवस! स्वस्तात मिळतायत TV-AC आणि वॉशिंग मशीन; किंमत ६,९९९ रुपयांपासून सुरू
itel T1 ब्लूटूथ हेडसेट

itel T1 ब्लूटूथ हेडसेटची किंमत फक्त १,४९९ रुपये आहे. या इयरबड्सला तुम्ही Flipkart Big Saving Days Sale मध्ये खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. आयटेलच्या या बड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट दिला आहे. यात १०.४ एमएम बेस बूस्ट ड्राइव्हर दिले असून, जे शानदार ऑडिओ प्रदान करतात. तसेच, ३५० एमएएचची दमदार बॅटरी देखील मिळते. तुम्ही सिंगल चार्जमध्ये या बड्सचा अनेक तास वापर करू शकता.
Mivi DuoPods F40

Mivi DuoPods F40 ची किंमत १,१९९ रुपये आहे. या बड्समध्ये क्रिस्टल क्लियर कॉलसाठी ड्यूल माइक सिस्टमचा सपोर्ट दिला आहे. हे १३ एमएमच्या पॉवरफुल बेस ड्राइव्हरसह येतात. सिंगल चार्जमध्ये यात ५० तासांचा प्लेबॅक टाइम मिळतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन ५.१ चा सपोर्ट दिला आहे. यात टच कंट्रोलसह गुगल व सिरी वॉइस असिस्टेंटचा सपोर्ट देखील मिळतो. दरम्यान, सेलमधील ऑफर्सनुसार वरील इयरबड्सच्या किंमतीत बदल होऊ शकतो.
वाचा: अवघ्या २ हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करा ‘या’ बेस्टसेलर स्मार्टवॉच, फीचर्स जबरदस्त
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times