नवी दिल्लीः प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्म ची रेटिंग गेल्या काही दिवसांत इंटरनेट युजर्संनी खाली आणली होती. तसेच टिकटॉकवर बंदी आणण्याची मागणी सुद्धा केली होती. आता नावाचा एक इंडियन अॅप TikTok ला टक्कर देत आहे. आतापर्यंत हे अॅप ५० लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. जवळपास एका महिन्यापूर्वी लाँच झालेले हे अॅप अल्पावधीतच खूप पॉप्यूलर झाले आहे.

वाचाः

आयआयटी रुडकीच्या एका विद्यार्थ्याने हे अॅप बनवले आहे. शिवांक अग्रवाल या मुलाने हे तयार केले आहे. या अॅपने गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री चार्टमध्ये टॉप १० च्या यादीत स्थान मिळवले आहे. सोमवारी हे अॅप टिकटॉक पेक्षाही वरच्या दुसऱ्या पोझिशनला पोहोचले होते. पेटीएमचे माजी सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट दीपक यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हे अॅप दुसऱ्या पोझिशनला दिसत आहे. या अॅपमध्ये टिकटॉक पेक्षा फार वेगळे फीचर्स दिले नाहीत. परंतु, हे आपल्या नावाने आणि ब्रँडिंगमुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे.

वाचाः

इंडियन युजर्सचा सपोर्ट
अॅप आता नवीन आहे. यात खूप सारे बग्स आहेत. असे असले तरी याला पॉझिटिव्ह रिव्ह्यू आणि रेटिंग्स मिळाली आहे. जवळपास ४.७ रेटिंग्स मिळणाऱ्या अॅपमध्ये बरेच बग्स असल्याचे युजर्संनी सांगितले. लॉग इन करण्यातही काहींना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. परंतु, इंडियन प्लॅटफॉर्म असल्याने लोक याला पसंत करीत आहेत. अॅपमध्ये टिकटॉक सारखे एडिटिंग फीचर्स सुद्धा नाहीत. ऑडिओ अॅड करण्याचा ऑप्शन सुद्धा मर्यादीत आहे. जर डेव्हलपर या दरम्यान बग्सला फिक्स करीत असेल किंवा नवीन फीचर्स अॅड केले तर हे अॅप खूप कमी कालावधीत प्रसिद्ध होईल.

प्ले स्टोरवरुन करा डाऊनलोड
केवळ ८.०३ एमबी साईज असलेल्या या अॅपला ११ एप्रिल २०२० रोजी रिलीज करण्यात आले आहे. आणि २४ मे रोजी अपडेट मिळाले आहे. हे अॅप केवळ अँड्रॉयड युजर्संसाठी उपलब्ध आहे. या अॅपला गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येऊ शकते. या अॅपचा इंटरफेस टिकटॉकसारखाच आहे. सध्या केवळ गुगलच्या मदतीने हे लॉग इन करता येऊ शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here