वाचाः
बजेट सेगमेंटमधील हा स्मार्टफोन असणार आहे. याचे वैशिष्ट्ये खास दमदार नसणार आहेत. गुगल प्ले कन्सोलच्या लिस्टिंगनुसार, स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४३९ चिपसेट दिला जाणार आहे. कमी किंमतीतील रेंजमधील फोनचा हा चिप आता जुना झाला आहे. याच रेंजमध्ये आता Helio G70 यासारखे चिपसेट मिळतात. सॅमसंगच्या नवीन डिव्हाईसमध्ये Galaxy A01 मध्ये मिळणारा प्रोसेसर दिला जाणार आहे. ए सीरिजच्या बजेट ऑफरिंगच्या तुलनेत फोनममध्ये १ जीबी जास्त रॅम दिली आहे.
Galaxy M01 चे फीचर्स
गॅलेक्सी M01 मध्ये एचडी प्लस डिस्प्ले मिळणार आहे. हा अँड्रॉयड १० आऊट ऑफ द बॉक्सवर काम करणार आहे. म्हणजेच हा फोन सॅमसंगच्या One UI 2.0 सोबत येईल. नवीन बजेट फोनशिवाय सॅमसंग एम सीरिज अंतर्गत हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतात ११ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात येणार आहे.
वाचाः
Galaxy M11 चे फीचर्स
नवीन Galaxy M11 मध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात येणार आहे. या फोनची किंमत १३ हजार रुपये असू शकते. या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा डिस्प्ले टॉप-लेफ्ट कॉर्नर मध्ये पंचहोल सोबत येईल. ज्यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. रियर पॅनेलवर १३ मेगापिक्सल, ५ मेगापिक्सल, अल्ट्रावाईड आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाईल. फोनच्या रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर असेल. तसेच या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाणार आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times