भारतात स्मार्ट टीव्हीचे मार्केट आता खूप मोठे झाले आहे. भारतीय बाजारात शाओमी पासून वनप्लस आणि मोटोरोला या सारख्या कंपन्यांनी आपले स्मार्ट टीव्ही लाँच करायला सुरुवात केली आहे. भारतात नुकताच रियलमीने आपला पहिला स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. ग्राहकांना यामुळे एक फायदा होत आहे की, कमी किंमतीत भारतीय ग्राहकांना स्मार्ट टीव्ही मिळत आहेत. कमी किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना मोठे पर्याय उपलब्ध होणार आहेत. कमी किंमतीत बेस्ट फीचर्स असलेले स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता वेगवेगळ्या कंपन्यांचे व स्मार्ट टीव्ही मिळण्याची सोय झाली आहे. कमी बजेट असलेल्या आणि ३२ इंचाचा टीव्ही हवा असलेल्या ग्राहकांना केवळ १५ हजार रुपयांत स्मार्ट टीव्ही खरेदी करता येऊ शकतो. जाणून घ्या या टीव्हीबद्दल…

रियलमीने आपला ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. या टीव्हीत एचडी रेडी डिस्प्ले दिला आहे. या टीव्हीचे रिझॉल्यूशन 1366×768 पिक्सल आहे. या टीव्हीत क्वॉड कोर मीडियाटेक प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज, डॉल्बी ऑडिओ स्पीकर देण्यात आले आहेत. गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट सपोर्ट करणाऱ्या या रियलमीच्या टीव्हीत प्ले स्टोरची सुविधा देण्यात आली आहे.

रियलमी टीव्ही प्रमाणे चीनची कंपनी शाओमीचा TV 4A Pro सुद्धा HD-ready स्मार्ट टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. या टीव्हीत क्वॉड कोर प्रोसेसर, १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या टीव्हीत Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube या सारखे अॅप्स सपोर्ट करतात. चीनची कंपनी शाओमीने या आधीच आपला स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केलेला आहे.

मोटोरोला कंपनीचा हा ३२ इंचाचा टीव्ही असून या टीव्हीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. हा टीव्ही अँड्रॉयड स्मार्ट टीव्ही आहे. गुगल असिस्टेंट आणि क्रोमकॉस्ट सपोर्ट करीत असतो. या टीव्हीत क्वॉडकोर प्रोसेसर, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज आणि २० वॅट ऑडियो आऊटपूट दिला आहे. या स्मार्ट टीव्हीचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे या टीव्हीत फ्री गेम कंट्रोलर देण्यात आला आहे. कमी किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर मोटोरोचा हा टीव्ही चांगला पर्याय ठरू शकतो.

सॅमसंगच्या सीरिज ४ एलईडी स्मार्ट टीव्हीची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्ट टीव्हीत क्वॉडकोर प्रोसेसर, १.२५ जीबी रॅम देण्यात आला आहे. या टीव्हीत Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube या सारखे खास अॅप्सचे फीचर देण्यात आले आहेत. या सर्व अॅप्सना याचा सपोर्ट मिळतो. या स्मार्ट टीव्हीचा आऊटपूट १० वॅट आणि डिस्प्ले रिफ्रेश रेट ५० एचझेडचा आहे. या रेंजमधील बाकी टीव्ही खूप कमी आहेत. त्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत टीव्ही हवा असल्यास सॅमसंग कंपनीचा हा टीव्ही एक चांगला पर्याय ठरू शकतो.

एलजीचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्हीची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. एलजीच्या या टीव्हीत १ जीबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. या टीव्हीत Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube या सारख्या अॅप्सला सपोर्ट करते. याचा स्पीकर आऊटपूट १० वॅट दिला आहे. भारतात एलजीच्या स्मार्टफोनला खूप मागणी आहे. त्याचप्रमाणे भारतात एलजीच्या स्मार्ट टीव्हीला खूप मागणी आहे. बाकी कंपन्यापेक्षा या टीव्हीची किंमत थोडी जास्त आहे. परंतु, स्मार्ट टीव्ही एक विश्वासू ब्रँड म्हणून ओळखला जातो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here