Raksha Bandhan Gifts: आज देशात Raksha Bandhan मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. हा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. राखीनिमित्त भाऊ- बहिण एकमेकांना भेटवस्तू देतात. काही लोक प्रसंगी दागिने देतात. तर, कुणी नवीन कपडे. पण, असे बरेच लोक असतील ज्यांनी आपल्या बहिणीला राखी भेट म्हणून कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट देण्याचा प्लान केला असेल. तुम्हीही यापैकीच असाल आणि तुम्हालाही या निमित्ताने कमी बजेटमध्ये तुमच्या बहिणीला काही Raksha Bandhan 2022 Gift द्यायचे असेल तर काळजीचे कारण नाही. कारण, आज आम्ही तुम्हाला काही कमी किंमतीत येणारे चांगले गॅजेट्स सुचवणार आहोत. जे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला गॅजेट्स गिफ्ट देऊन तिचा आनंद दुप्पट करू शकता.अशाच काही भन्नाट गॅजेट्सविषयी जाणून घेऊया, जे तुम्ही गिफ्ट देऊ शकता.आणि ते सुद्धा खूप किमतीत

Smartwatch

smartwatch

स्मार्टवॉच: हे डिव्हाइस आजकाल प्रत्येकाकडे दिसून येते. स्मार्टवॉचचा सध्या ट्रेंड आहे. पारंपारिक घड्याळाच्या तुलनेत तुम्ही फक्त वेळ पाहण्यापेक्षा बरेच काही करू शकता. जसे की हार्ट रेट मॉनिटर करणे, तुमच्या फिटनेसची काळजी घेणे किंवा हवामान अपडेट घेणे. त्यांच्याकडून कॉल आणि मेसेज नोटिफिकेशन्स पाहता येतील. पण, तुम्हाला जर स्मार्टवॉच राखीनिमित्त गिफ्ट करायचे असले तर त्यासाठी तुम्हाला स्मार्टवॉचसाठी थोडेसे बजेट वाढवावे लागेल. तुम्ही PTron Pulsefit P261 आणि TAGG Verve Neo सारखे पर्याय पाहू शकता.

वाचा: Latest Smartwatch: Samsung च्या २ भन्नाट स्मार्टवॉचेस लाँच, वॉच ECG, BP सह तुमच्या स्ट्रेस लेव्हलवर लक्ष ठेवणार

Gift Cards

gift-cards

गिफ्ट कार्ड्स: काय गिफ्ट द्यायचे हे ठरवता येत नसेल तर गिफ्ट कार्ड हा एक चांगला पर्याय आहे. Amazon, Flipkart, Myntra आणि Croma सारख्या अनेक प्लॅटफॉर्मवरून तुम्ही तुमच्या बहिणीला १००० रुपयांचे गिफ्ट कार्ड देऊ शकता. त्यामुळे त्यांना जे आवडते ते, ते खरेदी करू शकतात. यामुळे तुमचे बजेट देखील वाढणार नाही. तसेच, एक चांगले गिफ्ट खरेदी करण्याचे टेन्शन राहणार नाही.

वाय-फाय हॉटस्पॉट: दाचित तुमची बहीण देखील घरूनच काम करत असेल. अशात, तुम्ही तिला एअरटेल किंवा जिओ वाय-फाय डोंगल किंवा Wi-Fi हॉटस्पॉट भेट देऊ शकता. हॉटस्पॉट डिव्हाइसेस जास्तीत जास्त ३००० रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध असतील.

वाचा: राहा तयार ! या दिवशी भारतात येणार Infinix HOT 12, स्मार्टफोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह लेटेस्ट फीचर्स

Power Bank

power-bank

पॉवर बँक: आजकाल प्रत्येका कडे पॉवरबँक असतेच असते. पॉवर बँक एक पोर्टेबल चार्जर आहे. याच्या मदतीने स्मार्टफोन, इअरबड्स, स्मार्टवॉच किंवा टॅबलेटसारखे गॅजेट्स चार्ज करता येतात. पॉवर बँक कॉम्पॅक्ट देखील असतात त्यामुळे ते खिशात येतात. तुमच्यासाठी Mi Power Bank 3i 10000mAh, Ambrane 10000 mAh पॉवर बँक आणि PHILIPS 10000 mAh पॉवर बँक सारखे चांगले पर्याय असू शकतात. प्रवास करताना हे आवश्यक आणि सर्वात महत्वाच्या गॅजेट्स पैकी एक आहे म्हणून तुम्ही जर बजेट गिफ्ट खरेदी करणार असाल तर याचा विचार नक्की करा.

वाचा: Raksha Bandhan 2022: बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ कूल गॅजेट्स, फीचर्स भारी पण, किंमत कमी

True Wireless Earphones

true-wireless-earphones

ट्रू वायरलेस इयरफोन: तरुणांमध्ये या गॅझेट्सची खूपच क्रेझ पाहायला मिळते. विशेष म्हणजे, यांची किंमत अधिक नसल्याने प्रत्येकाला ते खरेदी करणे शक्य होते. True वायरलेस इयरफोन देखील आजकाल बरेच लोकप्रिय आहेत. हे तुम्हाला वायर्सपासून फ्री करतात. अशात अनेकांना ते खूप आवडतात. तसेच ते दिसायला Cool असतात . रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला True वायरलेस इअरफोन देखील भेट देऊ शकतात. यासाठी तुमच्याकडे Zebronics Zeb – Sound Bomb 1, Truke Buds F1 आणि PTron Basspods P11 सारखे पर्याय आहेत.

वाचा: Data Leak: बापरे ! २८ कोटी भारतीय युजर्सचा PF डेटा लीक ? UAN ते आधार डिटेल्सचाही समावेश

Bluetooth Speakers

bluetooth-speakers

ब्लूटूथ स्पीकर: तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा भावाला १००० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ब्लूटूथ स्पीकर भेट देऊ शकता. यासाठी तुमच्याकडे Infinity ( JBL) Fuze Pint, Mivi Play, boAt Stone 180 आणि Zebronics ZEB – VITA सारखे पर्याय आहेत. तुम्ही कुटुंबासोबत सुट्टीवर असाल किंवा मित्रांसोबत साहसी असाल, ट्रिपल वन ब्लूटूथ स्पीकर नेहमीच एक चांगला पर्याय असतो. त्यांच्या लहान आकारामुळे आणि रफ बॉडीमुळे ते खूप उपयुक्त आहेत. काही ब्लूटूथ स्पीकर देखील पाणी प्रतिरोधक असतात.

वाचा: Latest Smartwatch: Samsung च्या २ भन्नाट स्मार्टवॉचेस लाँच, वॉच ECG, BP सह तुमच्या स्ट्रेस लेव्हलवर लक्ष ठेवणार

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here