जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपल्या युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी नवीन अपडेट देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपमध्ये काही सीक्रेट फीचर्स आहेत. या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या चॅटिंगची मजा दुप्पट-तिप्पट वाढवू शकता. युजर्सला चांगला अनुभव मिळावा यासाटी WhatsApp ने या आधी व्हॉट्सअॅपमध्ये ‘डार्क मोड फीचर’ आणले होते. तसेच सोशल मीडियावरील फेक न्यूजला रोखण्यासाठी फॉरवर्डेड मेसेजची लिमिट कमी केली होती. तसेच व्हॉट्सअॅपने ३० सेकंदाचा व्हिडिओ स्टेट्स केवळ १५ सेकंदाचा केला होता. लवकरच नवीन फीचर लाँच करणार असल्याचे व्हॉट्सअॅपने जाहीर केले आहे. नवीन फीचर आल्यानंतर युजर्संची चॅटिंगची मजा दुप्पट होणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये याआधीच खूप सारे सीक्रेट फीचर्स आहेत जे अनेक युजर्संना माहितीच नाहीत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपमधील काही सीक्रेट ट्रिक्स संदर्भात माहिती देत आहोत. या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप चॅटिंगचे मास्टर होऊ शकता….
जर तुम्हाला वाटते की, तुमच्या व्हॉट्सअॅपचा ब्लू टिक ऑप्शन ऑन राहायला हवा आणि समोरच्या व्यक्तीला न कळता तुम्ही तो मेसेज वाचायला हवा. तर यासाठी एक जबरदस्त ट्रिक आहे. मेसेजला सीक्रेटली वाचण्यासाठी फोनला सर्वात आधी फ्लाईट मोडवर ठेवा. त्यानंतर मेसेज वाचा. व्हॉट्सअॅपच्या बाहेर या. त्यानंतर फोनला पुन्हा नॉर्मल मोडवर आणून ठेवा. असे केल्यास तुम्ही तुम्हाला हवे असलेले मेसेजही वाचू शकता. तसेच समोरच्या व्यक्तीला मेसेज वाचल्याचे माहितीही पडत नाही.
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जास्त सदस्य असल्याने दिवसभरात व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन येत राहतात. वारंवार फोनचा आवाज येत राहतो. त्यामुळे अनेक वेळा महत्त्वाच्या कामांत व्यस्त असताना सुद्धा लक्ष विचलीत होते. त्यासाठी ग्रुपमध्ये जा. वर दिलेल्या उजव्या बाजुला तीन डॉट्सवर टॅप करा. त्यानंतर ग्रुप इन्फोमध्ये जा. आणि त्याच्या म्यूट नोटिफिकेशनच्या टॉगलला ऑन करा. याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला मेसेज येतील परंतु, मेसेजमुळे जो आवाज येत होता. तो आता येणार नाही. त्यामुळे तुमचे महत्त्वाचे मेसेजचा आवाज आल्यानंतर तुम्ही मोबाइल हातात घेऊन तुमचे मेसेज चेक करु शकता.
व्हॉट्सअॅप चॅटिंग दरम्यान असे अनेक फोटो आणि व्हिडिओ येत असतात. ते आपण फोनच्या गॅलरीत सेव्ह करु शकत नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअॅपमध्ये एक खास ट्रिक देण्यात आली आहे. या सीक्रेट ट्रिकच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप मीडिया फाईलला फोनच्या गॅलरीत लपवू शकता. त्यामुळे आपली चॅट सेटिंग्स मध्ये जाऊन मीडिया व्हिजिबिलिटच्या टॉगलला ऑफ करावे लागणार आहे. या फीचर्सचा फायदाही अनेक जण घेत असतात तर अनेक व्हॉट्सअॅप युजर्संना या फीचरची पुसटशी कल्पना नसते. त्यामुळे हे फीचर सुद्धा फार उपयोग पडू शकते.
व्हॉट्सअॅपवर आपली खासगी माहिती कुणाला कळू नये, असे वाटत असेल तर काही ट्रिक्स तुमच्या उपयोगी पडू शकतात. यासाठी व्हॉट्सअॅपमधील लास्ट सीनला हाईड (लपवा) करण्याचा पर्याय दिला आहे. या ऑप्शला ऑन केल्यानंतर कोणत्याही व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्टला माहीती पडू शकत नाही की, तुम्ही किती वेळ ऑनलाइन राहिले आहात. हे ऑप्शन तुमच्या व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये दिलेल्या अकाउंट्स ऑप्शनवर मिळेल. या ठिकाणी जाऊन प्रायव्हेसीवर टॅप करा. आणि लास्ट सिनला ऑफ करा.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times