Best Smart TV: डब्बा टीव्हीची जागा आता स्मार्ट टीव्हीने घेतली आहे. खूप कमी घरांमध्ये आता साधा टीव्ही पाहायला मिळतो. तुम्ही देखील अजूनही साधा टीव्ही वापरत असाल तर कमी किंमतीत चांगला स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. बाजारात अगदी स्वस्तात एकापेक्षा एक चांगले स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे तुम्ही या टीव्हींना बँक, एक्सचेंज ऑफर्स आणि ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यास तुम्ही घरबसल्याच थिएटरचा आनंद मिळेल. सध्या बाजारात येणारे टीव्ही दमदार फीचर्ससह येतात. यामध्ये तुम्हाला शानदार साउंड आणि व्ह्यूइंग एक्सपीरियन्स मिळतात. प्रमुख ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वर वेगवेगळ्या साइटमध्ये येणारे स्वस्त टीव्ही उपलब्ध आहेत. अगदी ३०-४० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही Samsung, Realme आणि LG सारख्या कंपन्यांचे टीव्ही खरेदी करू शकता. या टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Samsung Crystal 4K UHD Neo Series

samsung-crystal-4k-uhd-neo-series

Samsung Crystal 4K UHD Neo Series मधील ४३ इंच मॉडेल दमदार फीचर्ससह येते. यामध्ये ४के अल्ट्रा एचडी एलईडी पॅनेल दिला असून, हा एचडीआर१०+ सपोर्ट आणि ५० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येतो. टीव्हीमध्ये क्रिस्टल ४के प्रोसेसर आणि PurColor टेक्नोलॉजी दिली आहे. यात Q-Symphony टेक्नोलॉजीसोबत २० वॉटचे स्पीकर दिले आहे. यामध्ये गुगल असिस्टेंट, Bixby आणि अ‍ॅलेक्सा वॉइस असिस्टेंटचा देखील सपोर्ट मिळतो. सॅमसंगच्या या ४३ इंच स्मार्ट टीव्हीची किंमत ३३,९९० रुपये आहे.

वाचा: जुना टीव्ही द्या आणि अवघ्या ३ हजारात घरी घेऊन जा Samsung चा नवीन स्मार्ट टीव्ही; जाणून घ्या डिटेल्स

​Realme 4K UHD Smart LED TV

realme-4k-uhd-smart-led-tv

Realme 4K UHD Smart LED TV देखील दमदार फीचर्ससह येतो. यात ४३ इंच टीव्हीमध्ये ४के UHD पॅनेल दिला आहे. यात क्रोमा बूस्ट इंजिन दिले आहे, जे ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि कलर वाढवते. टीव्ही ४K UHD मीडियाटेक प्रोसेसरसह येतो. टीव्ही पाहताना तुम्ही जबरदस्त एक्सपीरियन्स मिळेल. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वेगवेगळे पोर्ट देखील दिले आहेत. तसेच, यात अनेक अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील मिळेल. Realme च्या या टीव्हीची किंमत २७,९९९ रुपये आहे.

​LG UQ7500 4K UHD Smart TV

lg-uq7500-4k-uhd-smart-tv

तुम्ही जर ३५ हजारांच्या बजेटमध्ये चांगल्या कंपनीची स्मार्ट टीव्ही शोधत असाल तर LG UQ7500 4K UHD Smart TV चा विचार करू शकता. यात ४३ इंच ४के पॅनेल दिला आहे. यामध्ये वेगवेगळे ओटीटी अ‍ॅप्स आधीच इंस्टॉल मिळतील. टीव्ही HDR१० ला सपोर्ट करतो. यात HGiG टेक्नोलॉजी दिली असून, यामुळे HDR परफॉर्मेंसला ऑप्टिमाइज करून शानदार गेमिंग एक्सपीरियन्स मिळतो. २० वॉट ऑडिओ आउटपूटसह येणाऱ्या या टीव्हीची किंमत ३१,४९० रुपये आहे.

वाचा: iPhone 12 आणि iPhone 13 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, तब्बल २२ हजार रुपयांची होईल बचत

​Croma 109 cm (43 Inches) Full HD Certified Android Smart LED TV

croma-109-cm-43-inches-full-hd-certified-android-smart-led-tv

Croma चा ४३ इंच Full HD Certified Android Smart LED TV स्मार्ट टीव्ही ई-कॉमर्स साइट Amazon वर खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. क्रोमाच्या या टीव्हीची किंमत फक्त २०,९९० रुपये आहे. यामध्ये ४३ इंच स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी २ HDMI Ports, २ USB Ports, १ हेडफोन जॅक आणि 1 AV Input Slot दिला आहे. यात Netflix, Prime Video, Youtube आणि Disney+Hotstar सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील मिळतो.

​Redmi 108 cm (43 inches) Android 11 Series Full HD Smart LED TV

redmi-108-cm-43-inches-android-11-series-full-hd-smart-led-tv

Redmi च्या ४३ इंच Full HD Smart LED TV ची किंमत फक्त २२,९९९ रुपये आहे. या टीव्हीला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. टीव्ही अँड्राइड ११ वर काम करतो. यात Netflix, Prime Video, Youtube आणि Disney+Hotstar सारख्या असंख्य अ‍ॅप्सचा सपोर्ट दिला आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, USB, Ethernet, HDMI सारखे पर्याय मिळतील. टीव्ही खरेदीवर १ वर्षाची वॉरंटी देखील मिळेल.

वाचा: ओप्पोचे सॅमसंगच्या पावलावर पाऊल, ३२MP कॅमेऱ्यासह येणाऱ्या फोनची किंमत केली खूपच कमी; स्वस्तात खरेदीची संधी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here