Best Smart TV: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने देशभरातील प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्म्सवर वेगवेगळ्या सेलचे आयोजन केले जात आहे. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, कपड्यांपासून वेगवेगळ्या कॅटेगरीमधील प्रोडक्टसवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. Independence Day 2022 च्या निमित्ताने तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. मोठ्या स्क्रीनसह येणाऱ्या अनेक स्मार्ट टीव्हींवर तुम्हाला बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. सध्या बाजारात जुन्या साध्या टीव्हीऐवजी स्मार्ट टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कंपन्या देखील कमी किंमतीत मोठ्या स्क्रीनसह येणारे स्मार्ट टीव्ही सादर करत आहे. तुम्ही Samsung, Mi, Realme, Blaupunkt आणि Westinghouse सारख्या कंपन्यांच्या बेस्टसेलर स्मार्ट टीव्हींना डिस्काउंटसह स्वस्तात खरेदी करू शकता. या टीव्हींवरील ऑफरविषयी जाणून घेऊया.

​Blaupunkt 4K Android Smart UHD LED TV

blaupunkt-4k-android-smart-uhd-led-tv

Blaupunkt 4K Android Smart UHD LED TV स्मार्ट टीव्हीला स्वस्तात खरेदीची संधी आहे. Blaupunkt च्या या टीव्हीत ५० इंच ४के डिस्प्ले डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सलसह येतो. हा टीव्ही बेझल-लेस डिझाइनसह येतो. यात DTS TruSurround सर्टिफाइड ऑडिओ, डॉल्बी MS12 साउंड टेक्नोलॉजी दिली आहे. तसेच, ६० वॉटचा स्पीकर आउटपूट मिळतो. टीव्हीमध्ये २ जीबी रॅम आणि ८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळेल. तसेच, वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. या टीव्हीची किंमत जवळपास ३२ हजार रुपये आहे.

वाचा: १५ ऑगस्टपर्यंत Realme ची धमाकेदार ऑफर, ५जी स्मार्टफोनवर मिळेल बंपर डिस्काउंट

​Westinghouse UHD Android Smart LED 4K TV

westinghouse-uhd-android-smart-led-4k-tv

Westinghouse च्या टीव्हीला तुम्ही ६० टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. Westinghouse च्या स्मार्ट आणि नॉन स्मार्ट टीव्हीवर ऑफरचा फायदा मिळेल. कंपनीच्या २४ इंच नॉन-स्मार्ट एलईडी टीव्ही आणि ४ स्मार्ट अँड्राइड टीव्ही सीरिजमधील ३२ इंच एचडी रेडी, ४० इंच, ४३ इंच आणि ५५ इंच फुल एचडी टीव्हीवर ऑफरचा फायदा मिळेल. याशिवाय, ३२ इंच, ४३ इंच आणि ५० इंच UHD मॉडेलला देखील स्वस्तात खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत ३० हजार रुपयंपेक्षा कमी आहे.

वाचा: स्मार्टफोन सारख्या फीचर्ससह लाँच झाली Maxima ची शानदार स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

​Mi 4K Ultra HD Android Smart LED TV

mi-4k-ultra-hd-android-smart-led-tv

Mi 4K Ultra HD Android Smart LED TV देखील भारतात लोकप्रिय आहे. यामध्ये ४के Ultra HD रिझॉल्यूशनसह येणारा डिस्प्ले दिला आहे. स्क्रीन १७८ डिग्री व्ह्यूइँग अँगल ऑफर करते. यात ३ एचडीएम पोर्ट, दोन यूएसबी पोर्ट आणि ब्लूटूथ ५.० चा सपोर्ट मिळतो. टीव्ही अँड्राइड १० ओएसवर काम करतो. यात वेगवेगळ्या ओटीटी अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळेल. तसेच, ४K LED पॅनेल, डॉल्बी व्हिजन, HDR10+, HLG सारखे फीचर्स दिले आहेत. याच्या ४३ इंच मॉडेलची किंमत २६,४९९ रुपये आहे.

​Samsung UHD LED TV

samsung-uhd-led-tv

Samsung UHD LED TV मध्ये क्रिस्टल ४K UHD (३८४०×२१६०) पिक्सल स्क्रीन दिली असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात कनेक्टिव्हिटीसाठी HDMI पोर्ट मिळतील. या टीव्हीमध्ये अल्ट्रा एचडी (४के) एलईडी पॅनेल दिला आहे. तसेच, २० वॉटचा साउंड आउटपूट दिला असून, जो डॉल्बी डिजिटल प्लस ऑफर करतो. यामध्ये प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, नेटफ्लिक्स सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील मिळेल. याच्या ४३ इंच मॉडेलची किंमत ३५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

​VU 4K LED Smart TV

vu-4k-led-smart-tv

VU च्या या स्मार्ट टीव्हीत ४के अल्ट्रा एचडी (३८४०x२१६०) स्क्रीन दिली असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात ३ एचडीएम पोर्ट मिळतात. तर ३० वॉट साउंड आउटपूट दिला असून, जो डॉल्बी ऑडिओ, DTS व्हर्च्यूअल-X Surround Sound, TruBass HDX, TruSurround X आणि डायलॉग क्लॅरिटी सारखे फीचर्स सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड टीव्ही गुगल प्ले स्टोर, अ‍ॅक्टिवॉइस रिमोट कंट्रोल, क्रोमकास्ट बिल्ट-इन, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब, हॉटस्टार आणि ब्लूटूथ ५.० सारखे फीचर्स दिले आहेत. VU च्या ५५ इंच मॉडेलची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

वाचा: पुन्हा सुरू झाला Amazon चा खास सेल, निम्म्या किंमतीत खरेदी करता येईल स्मार्टफोन्स; पाहा डिटेल्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here