नवी दिल्लीः भारतात फास्टेस्ट विक्री होत असलेल्या स्मार्टफोनपैकी एक असलेला स्मार्टफोनवर ग्राहकांना सूट दिली जात आहे. चीनची कंपनी विवोचा सबब्रँड ने या स्मार्टफोनवर ३ हजार रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. हा डिस्काउंट स्मार्टफोनच्या सर्व मॉडल्सवर लागू असणार आहे. कंपनीची ही ऑफर २९ मे पासून १५ जून पर्यंत लागू असणार आहे. या फोनमध्ये ५जी कनेक्टिविटी, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर, ५५ वॅट सुपर फास्ट चार्जिंग यासारखे फीचर्स मिळतात. हे फोन दोन कलरमध्ये सिल्वर आणि ब्लॅकमध्ये दिले आहे.

वाचाः

कंपनीची ऑफर काय आहे ?
iQOO 3 स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज मॉडलची किंमत ३४ हजार ९९० रुपये तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत ३७ हजार ९९० रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे. या मॉडेल्सवर डिस्काउंटनंतर आता या फोनची किंमत अनुक्रमे ३१ हजार ९९० रुपये, ३४ हजार ९९० रुपये आणि ४१ हजार ९९० रुपये आहे. या ऑफरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या ऑफरचा लाभ केवळ बँक क्रेडिट कार्ड धारकांना मिळू शकणार आहे.

iQOO 3 ची खास वैशिष्ट्ये
या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. या डिस्प्लेत पंचहोल कॅमेरा आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ४४४० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ५५ वॅट सुपर फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये 48MP + 13MP + 13MP + 2MP चा क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Adreno 650 GPU दिला आहे. या फोनमध्ये साइडफ्रेममध्ये दोन टच सेन्सिटिव (मॉन्स्टर टच) बटन्स, अल्ट्रा गेम मोड आणि मल्टी टर्बो मोड दिला आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here