नवी दिल्लीः मोटोरोलाने २१ मे रोजी भारतात आपला 5000mAh ची बॅटरी असलेला स्मार्टफोन लाँच केला होता. या बजेटमधील स्मार्टफोनचा पहिला सेल २९ मे रोजी पार पडला. कंपनीने दावा केला आहे की, या फोनला भारतात जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या सेलमध्ये अवघ्या २० सेकंदात हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. हा फोन एक्सक्लूसिव्ह अंतर्गत ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर विकला जात आहे. या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. या फोनची टक्कर थेट Realme Narzo 10A आणि Redmi 8 यासारख्या फोनसोबत होणार आहे.

वाचाः

३ दिवसांची बॅटरी बॅक अप
या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच १० वॅटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्ज केल्यानंतर फोनची बॅटरी ३ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. सिंगल चार्जनंतर १९ तासांपर्यंत व्हिडिओ आणि १०० तासांपर्यंत गाणे ऐकता येतात.

मोटो जी ८ पॉवर लाईट
या फोनमध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन एचडी प्लस डिस्प्ले, 2.3Ghz ऑक्टा कोर Mediatek Helio P35 प्रोसेसर, आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहेत. स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप
Moto G8 Power Lite या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो व्हिजन सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here