तुम्हाला वनप्लसचा महागडा फोन खरेदी करायचा आहे का?, महागडा फोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे कमी बजेट आहे का?, परंतु, वनप्लस कंपनीने फोन खरेदी करण्याची संधी तुम्हाला यावेळी दिली आहे. वनप्लसच्या स्मार्टफोनवर तब्बल १० हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करण्याची ही खास संधी मिळत आहे. वनप्लस स्मार्टफोन दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जातात. कंपनीच्या या डिव्हाईसेसची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट Amazon इंडिया आणि oneplus.in वरून केली जात आहे. कंपनी Oneplus 7 पासून Oneplus 8 पर्यंत जवळपास सर्वच मॉडलवर डिस्काउंट ऑफर करीत आहे. जर तुम्हाला वनप्लस स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी खास संधी आहे. वनप्लसच्या कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट दिली जात आहे. सविस्तर जाणून घ्या….

वनप्लसचा हा स्मार्टफोन ६ हजारांपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. वनप्लस ७ च्या ६ जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत लाँचिंगवेळी ३२ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता हा स्मार्टफोन २९ हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे. तर ८ जीबी रॅम मॉडल केवळ ३४ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येवू शकतो. या शिवाय अॅमेझॉनवरून हा फोन खरेदी केल्यास युजर्संना एसबीआय कार्डवर १००० रुपयांचा इस्टंट डिस्काउंट दिला जात आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्लस ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

या फोनला MRP पेक्षा १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकले जात आहे. ८ जीबी रॅम असलेल्या या फोनची लाँचिंगवेळी किंमत होती. ५२ हजार ९९९ रुपये. पंरतु, आता हा फोन केवळ ४२ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. फोनचा १२ जीबी रॅम मॉडलची किंमत आता ४८ हजार ९९९ रुपये झाली आहे. वनप्लसचा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या अॅमेझॉनवर एसबीआय कार्डवरून पेमेंट केल्यास १२५० रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट दिले जात आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा प्लस ८ मेगापिक्सलचा प्लस १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वनप्लस ७ टी या स्मार्टफोनच्या खरेदीवर ३ हजारांची सूट दिली आहे. ८ जीबी रॅमच्या फोनची किंमत लाँचिंगवेळी ३७ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता हा फोन ३४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. त्यानंतर १२ मेगापिक्सलचा प्लस १६ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनच्या खरेदीवर एसबीआय कार्डवर अॅमेझॉवर १ हजार रुपयांचा तात्काळ डिस्काउंट दिला जात आहे.

वनप्लसचा 7T Pro या स्मार्टफोन खरेदी केल्यास तुमचा ६ हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो. फोनचा ८ जीबी मॉडलची किंमत लाँचिंगवेळी ५३ हजार ९९९ रुपये होती. परंतु, आता हा फोन तुम्हाला खरेदी करायचा असेल तर या फोनसाठी तुम्हाला केवळ ४७ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. म्हणजेच तुम्हाला हा फोन ६ हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकतो. या फोनच्या खरेदीवर काही ऑफर्स आहेत. अॅमेझॉनवरून हा फोन खरेदी केल्यास युजर्संना १२५० रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच या फोनच्या वैशिष्ट्यावर एक नजर टाकल्यास या फोनमध्ये मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. तसेच या फोनमधील ट्रिपल कॅमेऱ्यात 48+8+16MP कॅमेरा आहे. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वनप्लस कंपनीने वनप्लस ७ या सीरिजप्रमाणे वनप्लस ८ या स्मार्टफोनवर सूट दिली आहे. OnePlus 8 चा ६ जीबी रॅम मॉडलची किंमत ४१ हजार ९९९ रुपये, ८ जीबी रॅम मॉडलची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम मॉडलची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. वनप्लस ८ हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एसबीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास त्यांना २ हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. वनपल्स ७ टी सीरीज आणि वनप्लस ८ हा स्मार्टफोन खरेदी करण्याची ग्राहकांना चांगली संधी आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here