Best Smartphones: यावर्षी भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence Day 2022) साजरा करत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वेगवेगळ्या ई-कॉमर्स साइट्सवर सेलचे आयोजन केले जात आहे. तुम्ही प्रमुख ई-कॉमर्स साइट Amazon आणि Flipkart वरून स्मार्टफोन, टीव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना खरेदी करू शकता. विशेष म्हणजे कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची देखील ही चांगली संधी आहे. Independence Day 2022 च्या निमित्ताने तुम्हाला महागड्या स्मार्टफोन्सवर देखील बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्ही जर जास्त रॅमसह येणारे फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही ८ जीबी रॅमसह येणारे Redmi Note 11S, Redmi Note 11T 5G, Samsung Galaxy M32 5G, Vivo Y73 आणि iQOO Z6 5G सारख्या फोन्सला खरेदी करू शकता. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने (Independence Day 2022) या फोन्सवर मिळणाऱ्या ऑफरविषयी जाणून घेऊया.

​Redmi Note 11S

redmi-note-11s

Redmi Note 11S स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत २१,९९९ रुपये आहे. परंतु, २० टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. रेडमीच्या या फोनमध्ये ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

वाचा: ‘या’ टॉप-५ बेस्टसेलर स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट, Independence Day च्या निमित्ताने मिळेल ऑफरचा फायदा

​Redmi Note 11T 5G

redmi-note-11t-5g

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनची मूळ किंमत २२,९९९ रुपये आहे. परंतु, २२ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही किंमत फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. यात ६.६ इंचाचा शानदार फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोन Dimensity ८१० ५G प्रोसेसरसह येतो.

​Samsung Galaxy M32 5G

samsung-galaxy-m32-5g

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत २५,९९९ रुपये आहे. परंतु, २७ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त १८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५ इंच TFT – Infinity V-cut डिस्प्ले दिला आहे. यात फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा आणि फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोन Dimensity ७२० Octa Core २GHz प्रोसेसरसह येतो. यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

वाचा: Vivo चे ५ सर्वात स्वस्त स्मार्टफोन्स, किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी; पाहा लिस्ट

​Vivo Y73

vivo-y73

Vivo Y73 स्मार्टफोन देखील ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह येतो. फोनची मूळ किंमत २४,९९० रुपये आहे. परंतु, २० टक्के डिस्काउंटनंतर फक्त १९,९८९ रुपयात खरेदी करू शकता. यात रियरला ६४MP+२MP+२MP आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. विवोचा हा फोन ६.४४ इंच एमोलेड डिस्प्लेसह येतो.

​iQOO Z6 5G

iqoo-z6-5g

iQOO च्या या फोनला कंपनीने २१,९९९ रुपये किंमतीत लाँच केले होते. परंतु, १८ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही १७,९९० रुपयात खरेदी करू शकता. ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनमध्ये १२०Hz FHD+ डिस्प्ले दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोन Snapdragon६९५-६nm प्रोसेसरसह येतो. यात फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. दरम्यान, ऑफरनुसार वरील सर्व स्मार्टफोन्सच्या किंमतीत बदल होऊ शकतो.

वाचा: आधारशी मोबाइल नंबर लिंक करणे खूपच सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here