भारतात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढला आहे. देशात लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक जण अजूनही वर्क फ्रॉम होम करीत आहेत. वर्क फ्रॉम होम करीत असल्याने डेटा जास्त खर्च करावा लागत आहे. देशातील सर्वात मोठी खासगी कंपनी रिलायन्स जिओने २०२० मध्ये आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे रिचार्ज प्लान्स आणले आहेत. जिओकडून स्वस्त किंमतीतील प्लान युजर्संना दिले जात आहेत. जिओ अन्य नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा या प्लानवर देत नाही. नॉन जिओ नंबरवर कॉल करण्यासाठी युजर्संना ६ पैसे प्रति मिनिट आययूसी चार्ज द्यावा लागतो. ज्याच्याासाठी कंपनी लिमिटेड कॉलिंग मिनिट्स ऑफर करीत आहेत. जून २०२० मध्ये जिओ प्लान्सची अपडेटेड लिस्ट आम्ही खास वाचकांना या ठिकाणी देत आहोत.

१२९ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओचा हा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. १२९ रुपयांच्या या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता येते. यात युजर्संना २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १००० नॉन जिओ मिनिट्स मिळते. तसेज जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि ३०० एसएमएस मिळतात.

१४९ रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. यात एकूण २४ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३०० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात.

१९९ रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात एकूण ४२ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

२४९ रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. ग्राहकांना ५६ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि १०० एसएमएस मिळतात.

३२९ रुपयांचा प्लान

जिओ कंपनी या प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा देते. या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. तसेच १ हजार फ्री एसएमएस मिळतात. तसेच जिओ ते जिओ वर कॉलिंग साठी अनलिमिटेड आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३००० नॉन जिओ मिनिट दिले जातात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जातात.

३४९ रुपयांचा प्लान

हेवी डेटा युजर्संसाठी हा प्लान आहे. दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. कॉलिंगसाठी या प्लानमध्ये दररोज जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि रोज १०० एसएमएस मिळते.

३९९ रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. युजर्संना दरदिवस १.५ जीबी डेटा शिवाय १०० एसएमएस मिळतात. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी २००० नॉन जिओ मिनिट मिळतात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळतात.

४४४ रुपयांचा प्लान

कंपनी ४४४ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता देते. या पॅकमध्ये २ जीबी डेटा देते. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि नॉन जिओ नेटवर्कवर १००० मिनिट एफयूपी मिळते. या पॅकमध्ये १०० एसएमएस दरदिवस दिले जातात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

५५५ रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. दरदिवस १.५ जीबी डेटा दिला जातो. १०० एसएमएस दररोज दिले जातात. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३००० नॉन जिओ मिनिट मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते.

५९९ रुपयाचा प्लान

या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि १०० एसएमस दररोज मिळतात.

९९९ रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा दिला जातो. या पॅकची वैधता ८४ दिवस आहे. एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. व्हाईस कॉल जिओ ते जिओ अनलिमिटेड मिळते. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. ग्राहकांना दररोज १०० एसएमएस फ्री मिळते. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिपशन दिले जातात.

१२९९ रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, तर अन्य नेटवर्कवर १२००० नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि ३६०० एसएमएस मिळतात.

२१२१ रुपयांचा प्लान

मोठी वैधता असलेल्या या प्लानमध्ये ३३६ दिवसांची वैधता मिळते. दरदिवस १.५ जीबी डेटा मिळतो. युजर्संना एकूण ५०४ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स दिले जातात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि १०० एसएमएस दिले जातात.

२३९९ रुपयांचा प्लान

या प्लानमध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, तर अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी १२००० मिनिट्स नॉन जिओ मिळतात. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि १०० एसएमएस दिले जातात.

४९९९ रुपयांचा प्लान

३६० दिवसांची वैधता या प्लानमध्ये मिळते. या प्लानमध्ये डेली डेटाशिवाय ३५० जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओ नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी १२ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळते. तसे जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि रोज १०० एसएमएस मिळतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here