नवी दिल्लीः युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने Binge+ सर्विससाठी आणखी एक नवीन आणि धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनीने याची किंमत ५९९९ रुपयांवरून थेट ३९९९ रुपये केली आहे. तसेच कंपनीने बिंज प्लस सोबत ३ ते ६ महिन्यांपर्यंत ओटोटी कॉन्टेंटचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. या सर्विसमध्ये कंपनी सब्सक्रायबर्सला एकाच रिमोटमधून टीव्ही स्क्रीन आणि सॅटेलाईट ब्रॉडकास्ट चॅनेल आणि ओटीटी कॉन्टेंट पाहण्यासाठी सुविधा देत आहे.

वाचाः

गुगल असिस्टंट सपोर्ट
बिंज प्लस वरून युजर्संना कोणताही शो, मूव्ही, म्युझिक किंवा गेमचे आपल्या लॅपटॉप किंवा मोबाइल फोनवर एन्जॉय करता येऊ शकणार आहे. त्याला बिल्ट इन क्रोमकॉस्ट फीचरच्या मदतीने टीव्हीवर पाहता येऊ शकते. टाटा स्कायच्या या ऑफर्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही सेवा गुगल असिस्टेंट सोबत येते. गुगल असिस्टेंट सपोर्ट मुळे प्ले स्टोरवरील खूप सर्व गेम्स आणि अॅपची मजा घेता येवू शकते.

जुन्या टीव्हीसोबतही करणार काम
टाटा स्काय बिंज प्लस एक नेक्स्ट जनरेशन अँड्रॉयड सेट टॉप बॉक्स आहे. एचडीएमआय आऊटपूट मुळे हे 4K, HD, LED, LCD किंवा प्लाज्मा टीव्हीसोबत कनेक्ट करता येऊ शकते.

वाचाः

या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन
३९९९ रुपयांच्या टाटा स्काय बिंज प्लस सोबत कंपनी ६ महिन्यांचे डिज्नी प्लस हॉटस्टार, हंगामा, शेमारू आणि इरॉस नाऊ चे सब्सक्रिप्सन देत आहे. तसेच बॉक्ससोबत युजर्संना कोणत्याही एक्स्ट्रा कॉस्ट शिवाय ३ महिन्याचे अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन देत आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here