नवी दिल्लीः जवळपास चार वर्षाआधी सॅमसंगच्या Note 7 स्मार्टफोनमधील बॅटरीत कमतरता आली होती. त्यामुळे स्फोटाच्या घटना समोर आल्या होत्या. कंपनीला आपल्या डिव्हाईसचे उत्पादन थांबवावे लागले होते. आता पुन्हा एकदा सॅमसंगच्या गॅलेक्सी ए सीरिजच्या फोनमध्ये स्फोट होत असल्याच्या घटना समोर येत आहे. कॅलिफॉर्निया येथील एका युजर्सने याचा एक व्हिडिओ फुटेज शेअर केला आहे. एका ब्रँडच्या असलेल्या नोट ७ मध्ये स्फोट झाला असून प्रसिद्ध मध्ये स्फोट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फोनच्या बॅटरीमध्ये स्पार्क झाल्यानंतर या फोनला आग लागल्याचा दावा युजरने केला आहे.

वाचाः

DailyMail च्या रिपोर्टनुसार, कॅलिफॉर्निया येथील रहिवासी यानासेने या संदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत फटाके फुटल्याप्रमाणे आवाज येत आहे. तसेच फोनला आग लागल्याने फोन यात जळून खाक झाला आहे. युजरने एक व्हिडिओ बनवला आहे. चार वर्षाआधी Galaxy Note 7 डिव्हाईसमध्ये स्फोट झालेल्या व्हिडिओसारखाच हा व्हिडिओ असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मार्टफोन नोट ७ मध्ये काही तरी कमतरता असल्याचे बोलले जात आहे. स्फोटाचे नेमके कारण, अद्याप समोर आले नाही.

सॅमसंगने दिला विश्वास
युजरने म्हटले, माझ्या फोनची स्क्रीन खराब झाली होती. त्यामुळे मी फोनला बॅक पॅनलवरून ओपन केले. त्यात पाहणे सुरु केले. माझ्या हातात फोन होता. त्याचवेळी फोनच्या बॅटरीत स्पार्किंग सुरू झाली. फटाक्याप्रमाणे स्पार्किंग झाल्यानंतर फोन जळायला लागला. डेली मेलने सॅमसंगशी संपर्क केला. तसेच कंपनीकडून पब्लिक स्टेटमेंट सुद्धा जारी केले. सॅमसंगने सांगितले की, गॅलेक्सी ए सीरिज स्मार्टफोनची क्वॉलिटी आणि युजर्सच्या सुरक्षेवर आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही युजर्सशी संपर्क केला आहे. डिव्हाईनस परत घेऊन त्यानंतर पुढील तपास करण्यात येईल, असे सॅमसंगने म्हटले आहे.

बॅटरीची लाईफ असू शकते कारण
यानासे ने सांगितले होते की, फोनची स्क्रीन खराब झाली होती. फोन हातात होता. बॅटरीत स्पार्किंग झाल्याने या फोनला आग लागली. मी फोनला किचनच्या पॅनवर ठेवले होते. डॉग बाऊसमधून यावर पाणी फेकले परंतु, त्याची आग सुरूच होती. त्यामुळे मला पॅन बाहेर घेऊन जावे लागले. माझे संपूर्ण घरात धूर पसरला होता. तसेच वेगळाच वास येत होता. फोनची बॅटरी याला कारण असू शकते. कारण मदरबोर्डवर काहीही डॅमेज दिसले नाही. कंपनीने युजरच्या तक्रारीवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here