नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे जगभरात चीनवर आगपाखड केली जात आहे. करोना हा चीन निर्मित आहे, असा आरोप करीत अनेक देशांनी चीनवर हळूहळू बहिष्कार टाकायला सुरुवात केली आहे. अमेरिका – चीन यांच्यातील संघर्ष आता अधिक वाढला आहे. त्यामुळे चीनच्या उत्पादनावर भारतासह अनेक देशात बहिष्कार टाकला जात आहे. भारतीय युजर्स आपल्या मोबाइलमधून चायनीज अॅप्स हटवत आहेत. जर तुम्हाला चायनीज मोबाइल खरेदी करायचा नसेल तर बाजारात सध्या अनेक बेस्ट स्मार्टफोन उपलब्ध आहेत. सध्या टॉप पॉझीशनला असले तरी बाजारात इतरही फोन जबरदस्त आहे.

वाचाः

स्मार्टफोन मार्केटमध्ये , मोटोरोला, , वनप्लस, , विवो आणि हुवेई यासारखे ब्रँड्स हे चायनीज आहेत. नोकियाचा फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल करीत आहे. परंतु, या कंपनीतही मोठी गुंतवणून चीनमधून करण्यात आली आहे. चीनची कंपनी Foxconn हिची गुंतवणूक यात केलेली आहे. युजर्संनी कोणता फोन खरेदी करावा हा मोठा प्रश्न आहे. स्रवात मोठी स्मार्टफोन मेकर्स मध्ये सॅमसंगचा समावेश आहे. दक्षिण कोरियाची ही कंपनी आहे. या कंपनीचा चीनची काही देणे घेणे नाही. दक्षिण कोरियाची सॅमसंग, एलजी, तायवानचे आसुस, यूएसचे अॅपल आणि जपानमधील पॅनासोनिक यांच्याकडे मोठा स्मार्टफोनचे मार्केट उपलब्ध आहे.

वाचाः

बजेट आणि मिडरेंजमध्ये स्मार्टफोन
जर तुमचे स्मार्टफोन खरेदी करण्याचे बजेट कमी असेल किंवा तुम्ही २० हजारांपर्यंत मिडरेंजवर फोन खरेदी करायचे ठरवले असेल तर चायनीज कंपन्या सोडून तुम्हाला अर्ध्या डझनहून अधिक बेस्ट पर्याय उपलब्ध आहेत. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही Samsung Galaxy M10s, Galaxy A10s, LG W30 आणि Panasonic Eluga Ray 610 हे स्मार्टफोन खरेदी करु शकता. १० ते २० हजार रुपयांदरम्या फोन खरेदी करायचा असेल तर Samsung Galaxy M31, Galaxy M31s, LG W30 Pro फोन खरेदी करु शकता.

स्वस्तातील आणि प्रीमियम सेगमेंट
नवीन फोन खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट चांगले असेल तर खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Samsung Galaxy Note 10 Lite, Galaxy S10 Lite, Asus 6Z, ASUS ROG Phone 2, Google Pixel 3a आणि iPhone 8 सीरिजचे फोन खरेदी करु शकता. जर तुम्हाला ४० हजारांच्या वर स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Samsung Galaxy S20 सीरिज, LG G8X ThinQ, Google Pixel 3 XL आणि iPhone 11 सीरिजचे स्मार्टफोन खरेदी करु शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here