Xiaomi 12 Pro 5G

Xiaomi 12 Pro 5G स्मार्टफोन सेलमध्ये ४९,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड व ईएमआयने पेमेंट केल्यास तुम्हाला ६ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ५०MP+५०MP+५०MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात Snapdragon ८ Gen १ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. Xiaomi 12 Pro 5G मध्ये पॉवर बॅकअपसाठी१२० वॉट हायपरचार्ज सपोर्टसह ४६०० एमएएचची बॅटरी दिली आहे.
Xiaomi 11T Pro 5G

Xiaomi 11T Pro 5G स्मार्टफोन Amazon वर फक्त २९,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास ४५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा दिला आहे. फोन डॉल्बी व्हिजन डिस्प्लेसह येतो. यात १२०W HyperCharge सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली असून, फोन अवघ्या १७ मिनिटात फुल चार्ज होतो. Xiaomi 11T Pro 5G मध्ये Snapdragon ८८८ चिपसेटचा सपोर्ट मिळेल.
Xiaomi 11 Lite NE 5G

Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोनला ICICI बँक ऑफरसह २ हजार रुपये स्वस्तात खरेदीची संधी आहे. फोन १९,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. यात Qualcomm Snapdragon ७७८G प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. तर फोटोग्राफीसाठी रियरला ६४ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल आणि फ्रंटला २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी ४२५० एमएएचची बॅटरी मिळेल.
वाचाः फास्ट प्रोसेसर आणि २५६ जीबी SSD स्टोरेजसह येणारे ‘हे’ आहेत टॉप-५ लॅपटॉप, किंमत खूपच कमी
Xiaomi Mi 11X Pro 5G

Xiaomi Mi 11X Pro 5G स्मार्टफोन Amazon Sale मध्ये फक्त २९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनवर तुम्हाला १० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा देखील फायदा मिळेल. शाओमीच्या या ५जी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. तर फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तर पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जर सपोर्टसह ४५२० एमएएचची बॅटरी मिळेल.
Xiaomi Mi 11X 5G

Xiaomi Mi 11X 5G स्मार्टफोन ऑफरसह २२,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनवर ७ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८७० ५जी प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. तर १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले मिळतो. शाओमीच्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि फ्रंटला २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन ४५२० एमएएच बॅटरीसह येतो.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times