नवी दिल्लीः रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओने ४एक्स बेनिफिट ऑफर अंतर्गत रिलायन्स डिजिटल, ट्रेंड्स, ट्रेंड्स फुटवेअर आणि आजियो (Ajio) सोबत पार्टनरशीप केली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्सला जून महिन्यात जिओ रिचार्ज केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि फुटवेअरवर डिस्काउंट मिळणार आहे. हे डिस्काउंट ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध असणार आहे.

वाचाः

२४९ रुपयांपेक्षा जास्त रिचार्जवर मिळणार 4X बेनिफिट्स

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला २४९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करावा लागेल. असे केल्यास तुम्हाला रिलायन्स डिजिटल, ट्रेंड्स, ट्रेंड्स फुटवियर आणि आजियो वर डिस्काउंट मिळेल.

असा घ्या ऑफरचा फायदा

४ एक्स बेनेफिट्स ऑफर अंतर्गत तुम्हाला २४९ रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज केल्यानंतर एक कूपन मिळेल. या कूपनचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटल, ट्रेंड्स, ट्रेंड्स फुटवियर आणि आजियो स्टोर्स जावून डिस्काउंट मिळवू शकतात. हे कूपन ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी वापरु शकता. हे कूपन आपल्या माय जिओ अकाउंटवरुन मिळेल. रिचार्ज केल्यानंतर कूपन तुमच्या क्रेडिट अकाउंटवर दिले जाईल. याचा वापर तुम्ही नंतर करु शकता.

वाचाः

जुन्या आणि नवीन दोन्ही कस्टर्ससाठी ऑफर

ही ऑफर जिओच्या नवीन कस्टमर्ससोबत जुन्या ग्राहकांना सुद्ध मिळणार आहे. जुन्या ग्राहकांना या प्लानचा फायदा उठवण्यासाठी योग्य रिचार्ज करावा लागेल. जर त्यांच्याकडे आधीच कोणता रिचार्ज प्लान आहे. तर अतिरिक्त रिचार्ज करावा लागेल. त्यानंतर त्यांना या ऑफरचा लाभ मिळेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here