जर तुम्हाला चायनीज ब्रँडचा स्मार्टफोन खरेदी करायचा नाही का?, तुमचे उत्तर हो असेल तर मार्केटमध्ये खूप सारे बिगर चायनीज फोन आहेत. जे तुम्ही खरेदी करु शकता. देशाच्या टॉप फोन मेकर्समध्ये शाओमी, विवो, रियलमी, ओप्पो, टेक्नो, इनफिनिक्स आणि वनप्लस स्मार्टफोन आहेत. परंतु, हे सर्वच्या सर्व चीनच्या कंपन्यांचे फोन आहेत. चीन व्यतिरिक्त तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यापुढे पर्याय कमी राहतात. परंतु, ते तुम्ही खरेदी करु शकतात. नोकियाचे स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबल असली तरी यात चीनच्या Foxconn ची मोठी आर्थिक गुंतवणूक आहे. तसेच सॅमसंग, एलजी, अॅपल आणि पॅनासोनिक या कंपन्यांचे स्मार्टफोन तुम्ही खरेदी करु शकता. या स्मार्टफोनमध्ये चीनची गुंतवणूक नाही, तसेच या फोनशी चीनचे काही देणे घेणे सुद्धा नाही. चीन व्यतिरिक्त असलेले टॉप टेन नॉन चायनीज फोन्सची यादी तुम्हाला आम्ही या ठिकाणी देत आहोत….

एलजीची या सीरिज मध्ये दोन स्मार्टफोन आहेत. LG W30 आणि LG W30 Pro असे हे दोन स्मार्टफोन आहेत. या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्लस ५ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी काढण्यासाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये Helio P22 चिपसेट दिला आहे. त्यामुळे चीनचा मोबाइल खरेदी करायचा नसेल तर एलजीच्या या दोन फोनपैकी एक कोणताही तुम्ही खरेदी करु शकता.

सॅमसंगची प्रसिद्ध एम सीरीज मधील दोन स्मार्टफोन तुम्ही कोणताही एक खरेदी करु शकता. Galaxy M30s मध्ये ४८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आणि Galaxy M31 मध्ये ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा दिला आहे. या दोन्ही फोनमध्ये 6000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे. सेल्फी काढण्यासाठी या दोन्ही फोनमध्ये अनुक्रमे १६ मेगापिक्सल आणि ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सॅमसंगची एम सीरिज भारतात खूप पसंत पडलेली आहे. या फोनच्या क्वॉलिटीवर ग्राहक खूश आहेत. त्यामुळे चायनीज फोन खरेदी करायचा नसेल तर हा पर्याय बेस्ट आहे.

सॅमसंगची फ्लॅगशीप सीरिजचे दोन लाइट व्हेरियंट्स कॉम्पॅक्ट आहेत. हे फोन अफॉर्डेबल सुद्धा आहेत. Note 10 Lite मध्ये 12+12+12 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा आणि S10 Lite मध्ये 48+12+5 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. या दोन्ही फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सॅमसंगच्या या दोन्ही फोनमध्ये जबरदस्त फीचर्स मिळतात. भारतात या फोनला जबरदस्त मागणी आहे.

फ्लिप कॅमेरा असलेला फोन असून यात स्नॅपड्रॅगन ८५५ फ्लॅगशीप प्रोसेसर दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा आणि १३ मेगापिक्सलचा ड्यूअल कॅमेरा सेटअप दिला आहे. हा कॅमेरा फ्लिप होऊन फ्रंट कॅमेऱ्याचे काम करतो. 5000mAh बॅटरी असलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक व्हेरियंट्स दिले आहेत. त्यामुळे हा फोन खरेदी करता येऊ शकतो. या फोनमध्ये अनेक फीचर्स जबरदस्त आहेत. फ्लिप कॅमेरा झाल्यानंतर यात फ्रंट कॅमेऱ्याची गरज नाही. तसेच या फोनमध्ये नॉचलेस डिस्प्ले सुद्धा दिला आहे. हा फोन सुद्धा खरेदी करता येऊ शकतो.

आसुसचा हा फोन १२० एचझेड अमोलेड स्क्रीन सोबत आलेला जगातील पहिला फोन आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा असून तो IMX586 सोनी सेन्सरचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी २४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला चार्जिंग करण्यासाठी या फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच या फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन गेमिंग लव्हर्ससाठी खास डिझाईन केलेला आहे.

गुगलच्या या फोनमध्ये ५.६ इंचाचा ओलेड डिस्प्ले दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७० प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये १२.२ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच ३ ए स्मार्टफोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. लेटेस्ट अँड्रॉयड ९.० पाय ओएस दिला आहे. सेल्फी साठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ३० हजार ९९९ रुपये दिला आहे. गुगलच्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत.

या फोनमध्ये ६.२ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. तसेच स्नॅपड्रॅगन ८६५ आणि एनएम मोबाइल प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिला आहे. या फोनमधील कॅमेऱ्यात ३ एक्सचे हायब्रिड झूम आणि ३० एक्स चे डिजिटल झूम मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये १० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २० मध्ये या फोनची खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.

फोनमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स साठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम क्विक चार्ज ३.० सोबत ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. कॅमेऱ्यामध्ये या बॅकला १२ मेगापिक्सलचा स्टँडर्ड आणि १३ मेगापिक्सलचा सुपर वाईड लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनची किंमत ५४ हजार ९९० रुपये आहे. या फोनमध्ये देण्यात आलेले इतर फीचर सुद्धा दमदार आहेत. त्यामुळे चीनच्या कंपनीचा कोणताही फोन खरेदी करायचा नसेल तर तुमच्यासमोर हाही एक बेस्ट पर्याय आहे.

पिक्सल 3 XL या स्मार्टफोनमध्ये QHD+ (2960×1440 पिक्सल्स) फ्लेक्सिबल ओलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये बॅटरी ३४३० एमएएच क्षमतेची दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर या फोनची बॅटरी ७ तास १५ मिनिटापर्यंत चालू शकते. स्मार्टफोनमध्ये रियर पॅनेलवर १२.२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी गुगल डिव्हाईसमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

अॅपल कंपनीचा लेटेस्ट आयफोन ११ iPhone 11 सीरिजमध्ये जबरदस्त कॅमेरा दिला आहे. आयफोन ११ प्रो मॅक्स iPhone 11 Pro Max मध्ये ट्रिपल कॅमेरा दिला आहे. स्टँडर्ड मॉडल मध्ये ड्यूअल कॅमेऱ्याचा सेटअप देण्यात आला आहे. या सीरिज मधील स्मार्टफोन अॅपलचा लेटेस्ट ए १३ बायोनिक प्रोसेसर दिला आहे. फोनच्या रियर पॅनेलवर मिळणारे सेन्सर १२-१२ मेगापिक्सलचे आहेत. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. अॅपल कंपनीचा आयफोन खरेदी करण्यासाठी हा एक पर्याय चांगला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here