नवी दिल्लीः शाओमीच्या एका स्मार्टफोन्सला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. शाओमीच्या च्या पहिल्या सेलमध्ये अवघ्या ५ मिनिटात १०० कोटी रुपयांहून अधिक जास्त फोनची विक्री झाली आहे. शाओमीचा Redmi 10X चा ५ जी आणि ४ जी व्हेरियंटचा चीनमध्ये पहिला सेल पार पडला. रेडमीकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विबो वर करण्यात आलेल्या पोस्टच्या माहितीनुसार, केवळ ५ मिनिटात १०० मिलियन युआन (१०६ कोटी रुपये) हून अधिक स्मार्टफोनची विक्री झाली आहे. एका रिपोर्टनुसार, शाओमीने या सेलमध्ये जवळपास ५० हजार Redmi 10X स्मार्टफोनची विक्री केली आहे.

वाचाः

Redmi 10X सीरिजमध्ये आहेत ३ स्मार्टफोन
रेडमीने आपल्या Redmi 10X सीरिजमध्ये Redmi 10X 4G, आणि Redmi 10X Pro 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. पहिल्या सेलमध्ये आणि Redmi 10X 5G स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. Redmi 10X Pro 5G स्मार्टफोन ६ जूनला पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. Redmi 10X च्या 5G आणि 4G वेरियंटमध्ये अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम ५ जी कनेक्टिविटी, इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, ३.५ एमएम हेडफोन जॅक, आयआर ब्लास्टर, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

वाचाः

फोनची किंमत
Redmi 10X च्या ४जी व्हेरियंटचा ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९९९ युआन (१० हजार ५०० रुपये), तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ११९९ युआन (१२ हजार ६०० रुपये) तर Redmi 10X 5G स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५९९ युआन (१६ हजार ८०० रुपये), तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७९९ युआन (१९ हजार रुपये), ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २०९९ युआन (२१ हजार १५० रुपये) Redmi 10X 5G च्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३९९ युआन (२५ हजार ३०० रुपये), Redmi 10X Pro 5G च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३९९ (२५ हजार ३०० रुपये), तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २५९९ (२७ हजार ४०० रुपये) आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here