नवी दिल्लीः महाराष्ट्र सायबर सेलने टिकटॉक प्रमाणे काम करणाऱ्या Mitron अॅप युजर्संना एक अधिसूचना जारी केली आहे. या अॅडवायझरीमध्ये म्हटले की, या अॅपमध्ये सुरक्षेवरून खूप साऱ्या कमतरता आहेत. त्या तुम्हाला नुकसा पोहोचू शकतात. यामुळे हॅकर्स तुमचे अकाउंट हॅक करुन त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तसेच अकाऊंटवरून तुम्हाला धमकी सुद्धा दिली जाऊ शकते. महाराष्ट्र सायबर सेलने हा इशारा देताना एक ट्विटर पोस्ट सर्वांसाठी शेअर केली आहे. ज्यात सविस्तर माहिती दिली आहे. ज्यांनी कुणी हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड केले असेल त्यांनी तात्काळ हे अॅप डिलीट करावे, असे आवाहन केले आहे. गुगल प्ले स्टोरवरूनही Mitron अॅप हटवले आहे.

वाचाः

काय आहे कमतरता
सायबर सेलच्या माहितीनुसार, मित्रों अॅपवर कोणत्याही अकाउंटमधून लॉगिन केल्यानंतर केवळ यूजर आयडीची माहिती झाली पाहिजे. यासाठी पासवर्डची गरज पडत नाही. खरं म्हणजे अॅपमध्ये Login with Google चे फीचर देण्यात आले आहे. हे अॅप गुगल अकाउंटवरून खागी माहिती मिळवते तसेच ऑथेंटिकेशन साठी कोणत्याही सिक्रेट टोकनला क्रिएट करीत नाही.

यात लॉगिनसाठी सिक्योर सॉकेट लेयल (SSL) प्रोटोकॉल फॉलो केला गेला नाही. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. ते केवळ लॉगिन आयडी वरून तुमचे अकाउंट हॅक करु शकतात. म्हणजेच हॅकर्स तुमचे अकाउंटवरून कोणालाही मेसेज करु शकतात किंवा कमेंट करु शकतात.

काय आहे कारण
रिपोर्टच्या माहितीनुसार, हे एक पाकिस्तानी अॅप Tic Tic चे रिपॅकेज्ड व्हर्जन आहे. याशिवाय अॅपची मालकी नेमकी कुणाकडे आहे, याची माहिती समोर आली नाही. याची कोणतीही प्रायव्हसी पॉलिसी सुद्धा नाही. त्यामुळे सायबर सेलने या अॅपला तात्काळ डिलीट करण्यास सांगितले आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here