महागडा फोन असूनही Samsung चा फोल्डेबल फोन लोकांना खूप पसंत पडत आहे. २४ तासात या फोनला बंपर बुकिंग मिळाली आहे. सॅमसंगचे प्रोडक्ट मार्केटिंग हेड आदित्य बब्बर यांनी एका न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की, २४ तासात नवीन Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 स्मार्टफोनला रेकॉर्ड ब्रेक ५० हजार प्री बुकिंग मिळाली आहे. या फोन्सची किंमत ९० हजार रुपये ते १.५ लाख रुपये दरम्यान आहे. बब्बर यांनी सांगितले की, सध्याच्या अनुमानावरून असे दिसते की, बाजार चांगल्या प्रकारे वाढेल आम्ही दोन पटीने पुढे जावू. प्रीमियम कॅटेगरीत सॅमसंग गेल्यावर्षीच्या तुलनेत विक्रीत १.५ पट वाढला आहे. नुकताच लाँच करण्यात आलेला सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ४ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप ४ ला १० हजार स्टोर्समध्ये स्टॉक करण्यात येणार आहे.

१६ ऑगस्टपासून प्री बुकिंगसाठी उपलब्ध

एकूण विक्री पाहता मदतीसाठी १२ हजार प्वॉइंट्स वर उपलब्ध असेल. बब्बरने फोल्ड आणि फ्लिप फोनच्या प्रतिस्पर्धी मॉडलसंबंधी बोलताना सांगितले की, आम्ही प्रतिस्पर्धी ब्रँड्सच्या यूजर्सला आपल्या इकोसिस्टम मध्ये सहभागी करण्यासाठी उत्सूक आहोत. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी वॉच आणि बड्स वर मोठी सूट मिळत आहे. या डिव्हाइस सर्व प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोर्सवर १६ ऑगस्ट २०२२ पासून प्री बुकिंगसाठी उपलब्ध आहे.

वाचाः Vivo ने लाँच केला Monsoon Care प्रोग्रॅम, फोन रिपेयरिंगसाठी लेबर चार्जही द्यावे लागणार नाही , सोबत हे बेनिफिट्स

​भारतात Samsung Galaxy Z Fold ४ ची किंमत

-samsung-galaxy-z-fold-

हा स्मार्टफोन बेज, ग्रे ग्रीन आणि फँटम ब्लॅक कलर मध्ये उपलब्ध आहे. याची किंमत १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी १ लाख ५४ हजार ९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी १ लाख ६४ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय, भारतात १२ जीबी रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज व्हेरियंटची किंमत १ लाख ८४ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः २७ हजारांच्या टीव्हीला फक्त १० हजारात घेऊन जा घरी, पाहा भन्नाट ऑफर

Samsung Galaxy Z Flip ४ ची किंमत

samsung-galaxy-z-flip-

सॅमसंगचा हा स्मार्टफोन ग्रेफाइट, बोरा पर्पल आणि पिंक गोल्ड कलर्समध्ये उपलब्ध आहे. याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८९ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ९४ हजार ९९९ रुपये आहे. याशिवाय, ग्लास कलर्स आणि फ्रेम ऑप्शनचे बेस्पोक एडिशन सॅमसंग लाइव्ह आणि सॅमसंग एक्सक्लूसिव स्टोर्सवर ९७ हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे.

वाचाः Airtel वर भारी पडतोय Jio चा ‘हा’ स्वस्त रिचार्ज प्लान, समान किंमतीत मिळेल जास्त बेनिफिट्स

लाँच आणि डिल्स संबंधी जाणून घ्या सर्वकाही

गॅलेक्सी झेड फोल्ड४ ला प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Watch 4 Classic 46mm BT (याची वास्तविक किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे) फक्त २ हजार ९९९ रुपयात मिळेल. याशिवाय, ग्राहक एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास ८ हजार रुपये कॅशबॅक मिळवू शकतात. किंवा ८ हजार रुपयाचे अपग्रेड बोनस मिळवू शकतात.

वाचाः अवघ्या १० हजार रुपयांच्या बजेटमधील टॉप-५ स्मार्टफोन्स, मिळतात एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स

गॅलेक्सी झेड फ्लिप ४ किंमत

गॅलेक्सी झेड फ्लिप ४ ला प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Watch 4 Classic 42mm BT (याची वास्तवित किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे) फक्त २९९९ रुपयात मिळेल. एचडीएफसी कार्डचा वापर करून ७ हजार रुपयाचा कॅशबॅक मिळवू शकता येते. तसेच ७ हजार रुपयाचे अपग्रेड बोनसचा लाभ मिळतो. याशिवाय, जे ग्राहक आपला फोन प्री बुक करतील त्यांना फक्त ६ हजार रुपयात एक वर्षाचे सॅमसंग केयर प्लस सुद्धा मिळेल. याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. खरेदीसाठी २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन आहे.

वाचाः TV क्लिन करताना ‘या’ चुका पडतील महागात, स्क्रिन होणार लवकर खराब, अशी घ्या काळजी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here