नवी दिल्लीः शाओमीचा १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला शाओमीचा फोन च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या फोनची ही अधिकृत कपात करण्यात आली आहे. फोनची किंमत ३०० युआन म्हणजेच ३१०० रुपये कपात करण्यात आली आहे. ही कपात भारतीय ग्राहकांसाठी नाही. फोनची किंमत चीनच्या बाजारात कमी करण्यात आली आहे. भारतात हा फोन मागच्याच महिन्यात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये केवळ कॅमेराही नाही, ३ डी कर्व्ड डिस्प्ले आणि लेटेस्ट क्वॉलकॉम प्रोसेसर मिळतो. सर्वात पॉवरफुल स्मार्टफोनपैकी एक हा फोन समजला जातो. या स्मार्टफोनला कंपनीने ५जी कनेक्टिविटी सपोर्ट सोबत लाँच केला आहे. फोनची किंमत आजपासून लागू होणार आहे.

वाचाः

भारतात Mi 10 ची किंमत
भारतात या फोनला दोन स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ४९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५४ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला प्री ऑर्डर केल्यानंतर ग्राहकांना कंपनीकडून २५०० रुपयांचा ३० वॅट वायरलेस चार्जर फ्री देत आहेत. तसेच नो कॉस्ट ईएमआय आणि बँक ऑफर्स सुद्धा या स्मार्टफोन खरेदी वर दिले जात आहे.

वाचाः

Mi 10 चे फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटचा E3 AMOLED डिस्प्ले दिला आहे. फोनचे ३ डी कर्व्ड ६.६७ इंचाचा डिस्प्ले युजर्संना जबरदस्त आणि बेजललेस अनुभव देतो. एमआय १० मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ फ्लॅगशीप प्रोसेसर देण्यात आला आहे. ड्युल मोड ५ जी प्रोसेसर देण्यात आला आहे.

१०८ मेगापिक्सलचा कॅमेरा
या फोनमध्ये दमदार कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे. जे ८ के व्हिडिओ रिकॉर्डिंग सपोर्ट सोबत येतो. यात शूटस्टेडी मूड देण्यात आला आहे. जे OIS आणि EIS दोन्ही मदतीने व्हिडिओ आणइ इमेजेसला स्टेबल बनवतो. १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि सेटअपमध्ये २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणइ १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर दिला आहे. तसेच ड्यूल एलईडी फ्लॅश डिव्हाईस यात देण्यात आले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here