नवी दिल्लीः ४३ इंचाचा आज भारतात लाँच होत आहे. ३१ हजार ९९९ रुपये किंमत असलेला हा टीव्ही फ्लिपकार्टवर एक्सक्लूसिव आहे. फ्लिपकार्टवर हा टीव्ही मार्च महिन्यापासून टीज होत होता. लॉकडाऊन असल्याने या टीव्हीला लाँच करण्यात उशीर होत आहे. अखेर आता या टीव्हीची मार्केटमध्ये एन्ट्री झाली आहे. या टीव्हीचा सेल ८ जून रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरु होणार आहे. हा टीव्ही अँड्रॉयड ९ ओएस आणि डॉल्बी साऊंडसोबत आहे. नोकियाच्या या नवीन 4K LED UHD TV टीव्हीत काय-काय खास आहे जाणून घ्या.

वाचाः

नोकियाचा स्मार्ट टीव्ही ४३ इंचाचा
फ्लिपकार्टवर टीझरच्या आधारावर म्हटले जाऊ शकते की, ही टीव्ही ५५ इंचाचा मॉडलसारखाच दिसतो. टीव्ही मध्ये अल्ट्रा सिस्टम स्लिम बेजल आणि व्ही शेप फ्लूइड क्रोम पेडेस्टल दिले जाऊ शकते. हे कन्फर्म आहे की, टीव्ही अँड्रॉयड ९ पाय ओएसवर काम करतो.

वाचाः

टीव्हीत दमदार साउंड आउटपूटसाठी जेबीएल ऑडिओ देण्यात आले आहे. तसेच टीव्हीत तुम्हाला डॉल्बी व्हिजन सपोर्ट सुद्धा मिळेल. जबरदस्त कलर आणि पिक्चर अनुभवन्यासाठी यात 4K UHD सपोर्ट दिला आहे. नोकिया अँड्रॉयड टीव्ही ४३ इंचाचा बेल्ट इन क्रोम कास्ट सोबत आहे.

टीव्हीच्या अन्य वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास यात २.५ जीबीचा रॅम आणि १६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले आहे. क्वॉड कोर प्रोसेसर टीव्हीत Mali-450 MP GPU दिले आहे. साऊंडसाठी टीव्हीत १२ वॅटचे दोन स्पीकर दिले आहेत. डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस साऊंड सपोर्ट करते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here