फेसबुक (Facebook) जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर जाहीरातीसाठी खूप केला जातो. यातील काही जाहिराती या खऱ्या असतात. परंतु, फेसबुकवर अनेक अशा जाहिराती मिळतील ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चांगले महागात पडू शकते. अनेकदा फेसबुक ओपन केल्यानंतर तुमच्या समोर अशा अनेक जाहिराती येतात. ज्यात दावा करण्यात येतो की, महागडा स्मार्टफोन आता खूपच स्वस्त करण्यात आला आहे. कमी किंमतीत हा स्मार्टफोन मिळत आहे. सोशल मीडिया हाताळताना काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जर सोशलवर तुम्ही सावध झाला नाही तर तुमची फसवणूक करण्यासाठी अनेक जण त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा कोणताही सोशल मीडिया हाताळत असाल तर तुम्ही सावधिगी बाळगणे खूपच महत्वाचे आहे. फेसबुवर खोट्या आणि फसवणूक करणाऱ्या जाहिरातीबद्दल आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत…

अनेकदा फ्लिपकार्ट किंवा अन्य वेसाईटच्या नावाने लोकांची फसवणूक केली जाते. उदाहरण म्हणजे, आयफोन ११ प्रो केवळ ४,९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो, असा दावा केला जातो. इतका स्वस्त फोन मिळतोय, म्हणून अनेक जण दिलेल्या लिंकवर क्लिक करतात. आणि ते त्यांच्या स्वतःची फसवणूक करून घेतात. पाच हजारांत आयफोन कसा काय मिळू शकेल, असा साधा विचार सुद्धा करु शकत नाहीत. तुम्हाला क्लिक करण्यासाठी जी यूआरएल दिली जाते ती खोटी असते. तुमची फसवणूक करणारी असते.

फेक आणि खोट्या जाहिरातीत तुम्हाला मोठ्या डिस्काउंटचे अमिष दाखवले जाते. तुम्हाला आधीच सांगितले आहे की, खोट्या यूआरएलचा वापर करण्यात येतो. फ्लिपकार्टवर डिस्काउंटची ऑफर आहे, असे सांगून तुम्हाला जी लिंक दिलेली असते. ज्यावर क्लिक करताच तुम्हाला खोट्या फ्लिपकार्ट पेजवर घेऊन जाते. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या ठिकाणाहून काही खरेदी केल्यास तुमची चांगलीच मोठी आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. लोकांची फसवणूक करण्यासाठी ही लोक सेम टू से खोटी वेबसाईट तयार करतात, अनेकांना ही खरी आहे की खोटी याची माहिती होत नाही.

लोकांची फसवणूक करण्यासाठी फेक URL चा वापर करण्यात येतो. फ्लिपकार्टवर डिस्काउंटच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वाटेल की, आपण फ्लिपकार्ट पेजवर आलो आहोत. परंतु, या यूआरएलमध्ये इंग्रजी शब्दात फेरफार केलेला असतो. यूआरएल बारकाईने पाहिल्यास ते लक्षात येते. तोपर्यंत ते अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण क्लिक करीत असलेल्या वेबसाईटची यूआरएल बरोबर आहे की नाही, हे एकदा तपासून पाहिले तर पुढचा धोका टळू शकतो. आपली खूप मोठी आर्थिक फसवणूक केली जावू शकते. त्यामुळे कोणीही दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याआधी दहा वेळेस विचार केला तर तुमची फसवणूक होणार नाही.

फेक जाहिरात ही सर्वसाधारणपणे दिसणाऱ्या जाहिराती सारखीच दिसते. लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या फेक कंपन्या जाणीवपूर्वक ओरीजनल लोगोचा वापर करीत असतात. कुणाला जराही संशय येऊ नये यासाठी हे केलेले असते. त्यामुळे खरी जाहिरात कोणती व खोटी जाहिरात कोणती हे ओळखण्यासाठी यूआरएल बारकाईने पाहा. जर फ्लिपकार्टच्या आयफोन डिस्काऊंटच्या अॅडवर तुम्ही क्लिक केल्यास ज्या वेबसाईटवर तुम्ही जाल त्या ठिकाणी फ्लिपकार्टची स्पेलिंग Flipkart नसेल तर Flipkxrt अशी दिसेल. आपण बऱ्याचदा घाईघाईत पाहत नाही, आणि त्या ठिकाणी आपली फसवणूक केली जाते. त्यामुळे स्पेलिंग एकदा चेक करुन पाहा.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here