Jio 5G in India : देशातील 5G स्पेक्ट्रमचा लिलाव नुकताच पार पडला. या लिलावात देशातील खासगी कंपन्यांनी सहभाग घेतला. देशातील टॉप कंपन्यांनी स्पेक्ट्रम मिळवले आहे. या लिलावा नंतर देशात आता ५जी नेटवर्क सर्विसचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतातील प्रमुख मोबाइल सेवा देणारी कंपनी जिओ सुद्धा आपली ५जी सेवा सर्विसला लवकरच लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनी १५ ऑगस्टला आपली ५जी सर्विस सुरू करू शकते, असे आधी बोलले गेले. परंतु, तसे झाले नाही. परंतु, आता आणखी नवीन माहिती समोर येत असून लवकरच जिओ आपली ५जी सेवा सुरू करू शकते. आज आम्ही तुम्हाला Jio 5G सर्विस, 5G Launch, 5G Phone, 5G Price आणि Jio 5G SIM संबंधी सविस्तर माहिती देत आहोत, जाणून घ्या डिटेल्स.

​Jio 5G सर्विसची उपलब्धता

jio-5g-

भारतीय यूजर्ससाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जिओची ५जी सर्विस कधी लाँच होणार आहे. गेल्या वेळी ४जी सोबत कंपनीने एकाचवेळी देशात आपली सर्विस सुरू केली होती. त्यामुळे ५जी वरून जिओचा कोणता प्लान आहे. परंतु, जिओ कंपनी देशातील १ हजार शहरात ५जी सर्विस सुरू करणार आहे की, संपूर्ण देशात एकाचवेळी सर्विस सुरू करणार, हे अद्याप उघड झाले नाही.

वाचाः फोनमधून तात्काळ डिलीट करा हे ३५ धोकादायक ॲप्स, अन्यथा पश्चातापाची वेळ येईल, २० लाखांहून जास्त डाउनलोड

​Jio 5G लाँच डेट

jio-5g-

असे मानले जात होते की, कंपनी १५ ऑगस्ट रोजी आपली ५जी सर्विस संबंधी घोषणा करू शकते. परंतु, असे झाले नाही. आता समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी या महिन्यातील २९ ऑगस्ट पासून आपली AGM करीत आहे. या दरम्यान ५जी सर्विसवरून मोठी माहिती दिली जावू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या आठवड्यात ५जी सर्विसला अधिकृतपणे लाँच केले जावू शकते.

वाचाः आधार कार्डला लॉक आणि अनलॉक कसं करतात, माहिती आहे का?, पाहा सोप्या टिप्स

​Jio 5G फोन (Jio Phone 5G)

jio-5g-jio-phone-5g

५जी सर्विसच्या या चर्चे दरम्यान एक मोठे सरप्राइज समोर आले आहे. कंपनी आपला Jio 5G Phone लाँच करणार आहे. नुकत्याच लीक झालेल्या माहितीनुसार, कंपनी जिओ फोन ४जी प्रमाणे आता स्वस्त ५जी फोन लाँच करू शकते. याला कंपनीने Jio Phone 5G नाव दिले आहे. या फोनची बुकिंग २ हजार रुपयांपासून सुरू केली जावू शकते. तसेच या फोनला खरेदी करण्यासाठी सोप्या ईएमआयचा ऑप्शन सुद्धा दिला जावू शकतो.

वाचा: Smart TV Tips: TV क्लिन करताना ‘या’ चुका पडतील महागात, स्क्रिन होणार लवकर खराब, अशी घ्या काळजी

​Jio 5G किंमत

jio-5g-

४जी सर्विस लाँचिंग दरम्यान मुकेश अंबानी यांनी माहिती दिली होती की, त्यांची सर्विस भारतात सर्वात स्वस्त सर्विस असणार आहे. आता भारतात ४जी सर्विसला पाहिल्यास रिलायन्स जिओ सर्वात स्वस्त सर्विस आपल्या ग्राहकांना देत आहे. ५जी सर्विस मध्ये सुद्धा तुम्हाला हाच अनुभव मिळू शकतो. दुसऱ्या ऑपरेटर्सच्या तुलनेत ५जी सर्विस स्वस्त असेल. परंतु, सर्विस कॉस्ट यावेळी जास्त असेल. ५जी सुरुवातीत प्रीमियम यूजर्ससाठी असेल. जिओ दुसऱ्या ऑपरेटर्सच्या तुलनेत कमी परंतु, प्रीमियम चार्ज आकारू शकते.

वाचाः कधी लाँच होणार जिओ ५जी? किती असेल प्लान्सची किंमत? ‘या’ दिवशी होऊ शकतो खुलासा

​Jio 5G SIM

jio-5g-sim

यूजर्ससाठी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कंपनी कधीपासून Jio 5G SIM देणार आहे. २९ ऑगस्टला कंपनीची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून कंपनीचे ५जी सिम बाजारात उपलब्ध केले जावू शकतात. यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, जिओचे सिम कार्डसाठी कंपनी वेगळे पैसे आकारणार आहे का, की जुन्या सिम कार्डमध्ये ५जी नेटवर्क यूजर्संना मिळू शकणार आहे. यासारखे अनेक प्रश्न यूजर्संच्या मनात आहेत.

वाचाः ‘ओल्ड इज गोल्ड’ची पुरेपूर किंमत देणाऱ्या ‘टॉप ५’ वेबसाइट्स, सेकंड हँड फोन विका आणि नवा खरेदी करा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here